टोमॅटो सालीसकट खावा की साल काढून? आहारतज्ज्ञांनी सांगितली कोणती पद्धत योग्य
- Published by:Priya Lad
Last Updated:
Best Way To Eat Tomato: बरेच लोक टोमॅटोची साल खात नाहीत आणि सोलल्यानंतरच टोमॅटो वापरतात. तर बहुतेक लोक टोमॅटो धुतात सालीसकट वापरतात. पण मग टोमॅटो वापरण्याची नेमकी कोणती पद्धत योग्य हे आहारतज्ज्ञांनी सांगितलं आहे.
advertisement
1/7

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. टोमॅटोच्या सालीमध्येही अनेक पोषक घटक असतात.
advertisement
2/7
टोमॅटोच्या सालीमध्ये लायकोपिनसारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आढळतात. अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेली टोमॅटोची साल हृदयाच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. टोमॅटो त्याच्या सालीसह खाणं शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं.
advertisement
3/7
टोमॅटोची साल फायबरचा चांगला स्रोत आहे, जी पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. टोमॅटोची साल पचनसंस्था सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या देखील कमी करते. आहारतज्ज्ञ म्हणतात की जर तुम्हाला निरोगी पचन हवं असेल तर टोमॅटो सोलू नका. टोमॅटोची साल काढून टाकल्याने त्यातील पोषण कमी होऊ शकते. म्हणून टोमॅटो सालासह खावे.
advertisement
4/7
टोमॅटोची साल काढून टाकल्याने त्याचे सर्व पोषक घटक निघून जातात असं नाही. टोमॅटोचा गर देखील पोषक तत्वांनी भरलेला असतो. जर तुम्हाला टोमॅटोचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही टोमॅटो त्याच्या सालीसह खावा. जरी तुम्हाला साल काढावी लागली तरी ती हळूहळू आणि संतुलित पद्धतीने करा जेणेकरून पोषण कमी होणार नाही.
advertisement
5/7
आहारतज्ज्ञांचं म्हणणं आहे की टोमॅटोची साल शरीरातील चरबीकमी करण्यास मदत करते आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. याशिवाय, सालीमध्ये आढळणारे फायबर तुम्हाला बराच काळ पोट भरलेलं ठेवतं, ज्यामुळे जास्त खाण्याची शक्यता कमी होते.
advertisement
6/7
जर तुम्हाला पचनाच्या समस्या नसतील आणि तुम्हाला त्याची चव आवडत असेल तर टोमॅटो त्यांच्या सालीसह खाणे सर्वात फायदेशीर आहे. शरीराला संपूर्ण पोषण देण्यासोबतच ते तुमचं आरोग्यदेखील सुधारते. पण जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही साल काढू शकता.
advertisement
7/7
नोएडातील डाएट मंत्रा क्लिनिकमधील आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा यांनी न्यूज18 ला ही माहिती दिली आहे. आता तुम्ही टोमॅटो कसे खाता आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
टोमॅटो सालीसकट खावा की साल काढून? आहारतज्ज्ञांनी सांगितली कोणती पद्धत योग्य