Skin Care : पिंपल्स, काळया डागांनी चेहरा खराब दिसतोय? तुळशीच्या पानांचा मास्क वापरा, दिसेल फरक!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
आयुर्वेदात तुळशीच्या फायद्यांबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे. तुळस आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र ती त्वचेच्या अनेक समस्यादेखील सहज दूर करू शकते आणि आपल्याला सुंदर बनवू शकते. चला जाणून घेऊया तुळशीच्या पानांचा वापर कोणत्या पदार्थासोबत करावा आणि कसा.
advertisement
1/5

ही एक औषधी वनस्पती आहे, जी खोकला, सर्दी किंवा तापाच्या उपचारांमध्ये वापरली जाते आणि संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते.
advertisement
2/5
होय, तुळशीमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट घटक असतात, जे त्वचेला अतिनील किरणांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवू शकतात, फ्रिकल्स दूर करू शकतात आणि पिंपल्सची समस्या टाळू शकतात. अशा प्रकारे आपली त्वचा डागरहित होऊ शकते आणि वृद्धत्वाची चिन्हेदेखील कमी होऊ शकतात.
advertisement
3/5
पहिली पद्धत : चेहरा नीट धुवून पुसून घ्या. आता एका वाटीत दोन ते तीन चमचे तुळशीची पावडर किंवा पेस्ट घ्या आणि त्यात एक ते दोन चमचे दही घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे राहू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही कोरड्या त्वचेवरही हे वापरू शकता.
advertisement
4/5
दुसरी पद्धत : एका भांड्यात एक चमचा तुळशीची पावडर, एक चमचा मुलतानी माती, एक चमचा चंदन पावडर, 4 थेंब जोजोबा ऑइल, 5 थेंब गुलाबजल घालून मिक्स करा. आता हे चेहऱ्यावर आणि मानेला लावा आणि अर्ध्या तासानंतर चेहरा धुवा.
advertisement
5/5
तिसरी पद्धत : एका भांड्यात एक चमचा कोरडी किंवा ताजी तुळशीची पाने, एक चमचा ताजी किंवा कोरडी कडुलिंबाची पाने, थोडासा लिंबाचा रस आणि पाणी एकत्र करून मिक्स करा. चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटांनी चेहरा धुवा. 3 ते 4 वापरानंतरच डाग नाहीसे होतील. मात्र वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Skin Care : पिंपल्स, काळया डागांनी चेहरा खराब दिसतोय? तुळशीच्या पानांचा मास्क वापरा, दिसेल फरक!