Labubu Rakhi: यंदा लबूबू राखीची क्रेझ, सोशल मीडियानंतर बाजारपेठेतही धुमाकूळ
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Labubu Rakhi: इन्स्टाग्राम आणि विविध सोशल मीडियावर लबूबू कॅरेक्टरच्या व्हिडीओंना मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता, अनेक राखी उत्पादकांनी यावर्षी या थीमवर राख्या सादर केल्या आहेत.
advertisement
1/5

छत्रपती संभाजीनगर: रक्षाबंधन अवघ्या काही तासांवर आले असून, बाजारपेठा पारंपरिक राख्यांनी फुलल्या आहेत. मात्र, यंदाच्या राखी खरेदीत लबूबू राखीची वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. ही राखी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व वयोगटातील ग्राहक या राख्यांकडे आकर्षित होत आहेत.
advertisement
2/5
....लबूबू हे 'द मास्टर्स' या व्हिएतनामी डिजिटल आर्ट बँडमधील एक लोकप्रिय कॅरेक्टर आहे. बुटके शरीर, मोठे डोळे आणि मजेशिर चेहरा असलेलं या पात्राची इंटरनेटवर खूपच चर्चा आहे. बाजारपेठेत लबूबू डॉल आणि इतर कार्टून्सच्या राख्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
advertisement
3/5
....लबूबू राखीची किंमत 200 ते 350 रुपयांदरम्यान आहे. त्याशिवाय पारंपरिक झरझरीत, कुंदन, मोरपंख, पर्ल डिझाईन असलेल्या राख्या आणि सुपरहिरो, युनिकॉर्न, मिनियन, टॉम अँड जेरी इत्यादी कार्टून थीम्स असलेल्या राख्या 50 ते 500 रुपयांपर्यंत मिळत आहेत.
advertisement
4/5
बाजारात 5 रुपयांपासून 500 आणि 1 हजार रुपयांपर्यंत किमतीच्या राख्या विक्रीसाठी आणल्या असल्याची माहिती राखी विक्रेते गणेश तांदळे यांनी लोकल 18शी सोबत बोलताना दिली. लहान मुलांसाठी कार्टून राख्यांकडे तर तरुणांसाठी लबूबू आणि ट्रेंडी राख्यांकडे ग्राहकांचा कल दिसत आहे.
advertisement
5/5
इन्स्टाग्राम आणि विविध सोशल मीडियावर लबूबू कॅरेक्टरच्या व्हिडीओंना मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता, अनेक राखी उत्पादकांनी यावर्षी या थीमवर राख्या सादर केल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Labubu Rakhi: यंदा लबूबू राखीची क्रेझ, सोशल मीडियानंतर बाजारपेठेतही धुमाकूळ