TRENDING:

Healthy Relationship : महागड्या गिफ्ट्सऐवजी नात्यात 'या' 8 सवयी जास्त गरजेच्या! नातं बनवतात घट्ट आणि आनंदी

Last Updated:
Healthy Relationship Habits : कोणतेही नाते, विशेषतः पती-पत्नी किंवा प्रियकर-प्रेयसीचे नाते, केवळ मोठ्या रोमँटिक क्षणांवर टिकून राहत नाही. रोजच्या जीवनातील छोट्या-छोट्या सवयी आणि कृती, नात्याचा पाया अधिक मजबूत करतात. प्रेम, आदर आणि एकमेकांबद्दलची काळजी व्यक्त करण्याच्या 'या' सवयीच दोन व्यक्तींना आयुष्यभर आनंदी ठेवतात. काही सवयी तुमचे नाते खरोखरच निरोगी आणि मजबूत बनवतात.
advertisement
1/7
महागड्या गिफ्ट्सऐवजी नात्यात 'या' 8 सवयी जास्त गरजेच्या! नातं बनवतात घट्ट-आनंदी
रोज संवाद साधणे : कितीही व्यस्त असलात तरी जोडपे एकमेकांशी रोज बोलण्यासाठी वेळ काढतातच. तुम्ही तुमच्या पार्टनरला रोज त्यांचा दिवा कसा गेला हा प्रश्न तर विचारलाच पाहिजे. यासारख्या छोट्या गोष्टी देखील दोघांना जवळ आणतात आणि त्यांना बोलून त्यांचे मन मोकळे होत आहे, याची जाणीव करून देतात.
advertisement
2/7
लक्ष देऊन ऐकणे : बोलणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच लक्ष देऊन ऐकणे देखील महत्त्वाचे आहे. जेव्हा पार्टनर एकमेकांचे बोलणे खरेच ऐकतात आणि मध्ये मध्ये विचारपूर्वक प्रश्न विचारतात, तेव्हा नाते अधिक सखोल होते आणि दोघांमधील समजूतदारपणा वाढतो.
advertisement
3/7
कृतज्ञता व्यक्त करणे : एक साधासा 'धन्यवाद' तुमच्या पार्टनरसाठी खूप महत्त्वाचा असतो. तुमचा पार्टनर तुमच्या रोजच्या लहान-लहान कामांमध्येही मदत करत असेल, तरीही तुम्ही त्याचे आभार मानले पाहिजेत. यामुळे प्रेम आणि आदर दोन्ही वाढतात.
advertisement
4/7
प्रेमळ शारीरिक हावभाव : नात्यात रोमान्स टिकवून ठेवण्यासाठी हात धरणे, मिठी मारणे किंवा हलकासा स्पर्श करणे देखील फायदेशीर ठरू शकते. या गोष्टी नात्याला मजबूत बनवतात आणि प्रेम व्यक्त करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.
advertisement
5/7
मिळून काम करणे : एखादे जोडपे एकमेकांवर खरोखर प्रेम करत असेल आणि आदर करत असेल, तर ते घरातील जबाबदाऱ्या आपापसात वाटून घेतात. यामुळे कामाचा ताण कमी होतो आणि भागीदारीची भावना मजबूत होते.
advertisement
6/7
साध्या भेटवस्तू : सरप्राईज देण्यासाठी मोठ्या गोष्टी आवश्यक नसतात. कधीकधी एक छोटीशी हस्तलिखित नोट किंवा चॉकलेट लपवून ठेवल्यास तुमच्या पार्टनरचा दिवस आनंदात जातो.
advertisement
7/7
क्वालिटी वेळ : फोन किंवा स्क्रीनपासून दूर राहून एकत्र वेळ घालवणे. जसे की फिरायला जाणे किंवा एकत्र पुस्तक वाचणे, हे नात्याला अधिक मजबूत करते आणि भावनिक जोडणी वाढवते. एकमेकांसोबत विनोद शेअर करणे किंवा हलकी-फुलकी चेष्टा-मस्करी करणे, नात्यात आनंद निर्माण करते आणि दोघांमध्ये खोलवरचा जिव्हाळा निर्माण करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Healthy Relationship : महागड्या गिफ्ट्सऐवजी नात्यात 'या' 8 सवयी जास्त गरजेच्या! नातं बनवतात घट्ट आणि आनंदी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल