TRENDING:

Wax on apple: सावधान! सफरचंद खाताय मग ही चूक करू नका, सफरचंदावरचं मेण ठरेल धोकादायक

Last Updated:
Wax on apple: बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक उपयुक्त फळांपैकी एक फळ म्हणजे सफरचंद. सफरचंदामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे सफरचंद त्वचेपासून पोटाच्या आजारांवर गुणकारी ठरू शकतं. मात्र अनेकदा सफरचंदावर लावलेल्या मेणामुळे असं सफरचंद खाणं आरोग्यासाठी धोक्याचं ठरतं. जाणून घेऊयात सफरचंदावर मेण लावलंय की नाही ते ओळखण्याच्या काही काढण्याच्या काही सोप्या टीप्स.
advertisement
1/7
Wax on apple: सावधान! सफरचंद खाताय ? मग ‘घ्या’ ही काळजी, अन्यथा होईल नुकसान
मेण लावल्यामुळे सफरचंदाची लकाकी वाढते. त्यामुळे ते आकर्षक दिसतं मात्र आतून खराब असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्ही खरेदी करत असलेलं लाल सफरचंद हे चांगलं असेलच याची खात्री नाही.
advertisement
2/7
सफरचंद हे एक नाशवंत फळ आहे. भारतात प्रामुख्याने सफरचंद ही हिमाचल प्रदेश आणि हिमालयातून येतात. त्यामुळे अनेक दिवसांसाठी ती टिकवून ठेवण्यासाठी सफरचंदावर मेणाचा हलकासा थर लावतात. जेणेकरून ते अधिक दिवस चांगलं राहू शकेल.
advertisement
3/7
प्रवासादरम्यान सफरचंद खराब होऊ नयेत आणि ती अधिक दिवस टिकून राहावीत यासाठी त्यावर मेणाचा थर लावण्याची परवानगी ही अन्न व उत्पादन शुल्क खात्याकडून देण्यात आली आहे. मात्र मेणाचा थर किती असावा, त्यातले घटक हे आरोग्यासाठी अपायकारक नसावेत अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
advertisement
4/7
मात्र प्रत्येक व्यापाऱ्यांकडून या अटी आणि शर्थींचं पालन होतं की नाही हा प्रश्नच आहे. त्यामुळे बाजारातून आणलेलं सफरचंद फक्त धुवूनच नाही तर त्यावरील मेण काढून खाणं महत्त्वाचं ठरतं.
advertisement
5/7
सफरचंदावर असलेल्या मेणामुळे सफचंदाची गुणवत्ता बदलू शकते. ज्याचा परिणाम चवीवरही होतो. सफरचंदावर लावलेलं मेण पोटात गेल्याने पचनास अडथळा होऊन पोटदुखी किंवा अन्य आजार होऊ शकतात.
advertisement
6/7
सफरचंदात मेण आहे का ? हे शोधायचं असेल तर एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात सफरचंद बुडवून ठेवावीत. त्यामुळे सफरचंदावर असलेला मेण सहजगत्या निघायला मदत होईल.
advertisement
7/7
मेणाचा थर काढण्यासाठी तुम्ही व्हिनेगर वापरू शकता. यासाठी साध्या पाण्यात एक चमचा व्हिनेगर टाका. या पाण्यात सफरचंद थोडावेळ बुडवून ठेवा. काही वेळाने ही सफरचंद स्वच्छ पाण्यात धुवून पुसून घ्या. व्हिनेगरमुळे मेणाचा थर लगेच निघून जाईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Wax on apple: सावधान! सफरचंद खाताय मग ही चूक करू नका, सफरचंदावरचं मेण ठरेल धोकादायक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल