TRENDING:

गजानन महाराजांच्या दर्शनाला शेगावला जाताय? प्रवास, निवास अन् सर्व प्रश्नांची उत्तरं इथं पाहा

Last Updated:
संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी देशभरातून रोज हजारो भाविक शेगाव येथे येतात.
advertisement
1/9
गजानन महाराजांच्या दर्शनाला शेगावला जाताय? कशी आहे प्रवास, निवास सोय?
विदर्भातील श्री क्षेत्र शेगाव हे दत्त संप्रदायातील महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी देशभरातून रोज हजारो भाविक येथे येतात. केवळ महाराष्ट्रच नाही तर भारतातील वेगवेगळ्या राज्यातील भक्तांची मांदियाळी वर्षभर याठिकाणी असते. शेगावला जाण्यासाठी प्रवास आणि निवासाची सोय कशी आहे? याबाबत सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
2/9
सर्वप्रथम शेगाव येथे येण्यासाठी अनेक रेल्वे वेगवेगळ्या जिल्ह्यातून उपलब्ध आहेत. रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर जवळच मंदिर आहे. दर्शनाला जाणाऱ्या भक्तांसाठी संत गजानन महाराज संस्थानची बस निःशुल्क उपलब्ध असते. त्याशिवाय ऑटो रिक्षाने देखील जाता येईल. तसेच तुम्ही जर रेल्वेने परत जाणार असाल संस्थानची बस रेल्वे स्टेशनपर्यंत मोफत सोडते.
advertisement
3/9
भक्त निवासात भक्तांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येते. ज्यात अगदी कमी खर्चात 24 तास राहता येईल. सर्वप्रथम भक्त निवासात गेल्यावर भक्तांची गर्दी असल्यास वेटिंग असू शकतं. सुट्टीच्या दिवसांमध्ये शक्यतो वेटिंगचा त्रास भक्तांना सहन करावा लागू शकतो.
advertisement
4/9
आपल्याला कमी वेळेत खोली हवी असल्यास मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या 'विसावा' येथेही व्यवस्था करण्यात आली आहे. (त्याठिकाणी जाण्यासाठी भक्त निवासासमोरच संस्थानच्या निःशुल्क बसेस सतत उपलब्ध असतात)
advertisement
5/9
मंदिराच्या जवळ असलेल्या भक्त निवासात राहण्यासाठी रूम उपलब्ध होईपर्यंत किती वेळ लागू शकतो? याचा अंदाज सेवेकरी सांगतात. तसेच चौकशी कक्षात आपण चौकशी करू शकतो. मंदिर जवळच्या भक्त निवासात रुपये 250 ते 900 रुपयांपर्यंत रूम उपलब्ध आहेत.
advertisement
6/9
निवास व्यवस्थेसाठी रांग लावून आपला क्रमांक येईपर्यंत वाट बघावी लागू शकते. त्यांनतर मंदिर भक्त निवासातील सेवेकरी एक फॉर्म आपल्याकडे देतात. त्यात तुम्ही जर एकच कुटुंब असाल तर बेड प्रमाणे एक रूम सहज मिळू शकते. मात्र तुम्ही नातेवाईकांसोबत जात असाल तसेच कुटुंब वेगळे आणि नातेवाईक महिला-पुरुष सोबत असतील तर एका कुटुंबातील सदस्यांना एक खोली दिली जाते. त्यासाठी प्रत्येकाचे आधार कार्ड स्कॅन करून घेतले जातात.
advertisement
7/9
निवास व्यवस्थेसाठी दिलेल्या फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरून त्याठिकाणी सबमिट करावी लागेल. त्यानंतर खोलीची चावी भक्तांकडे दिली जाते. त्यात 2 बेड विथ वॉशरूम असलेल्या खोल्यांसाठी केवळ 250 रुपये शुल्क आकारले जाते. सर्व खोल्या अतिशय स्वच्छ असून मन प्रसन्न करणारे वातावरण याठिकाणी आहे.
advertisement
8/9
संत गजानन महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी रांगेत लागावे. दर्शन झाल्याबर गजानन महाराजांच्या समाधी मंदिरात विजयग्रंथ किंवा इतर स्तोत्र वाचन करण्यासाठी तिथेच उपलब्ध आहेत. भक्त हे साहित्य वाचन करु शकतात. त्यानंतर महाप्रसाद सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत उपलब्ध असतो.
advertisement
9/9
ज्यात पोळी, बटाट्याची भाजी, पिठलं, बुंदीचा लाडू किंवा शिरा, डाळ आणि भात असा महाप्रसाद असतो. शिवाय जे भक्त भक्त निवासात महाप्रसादाची वेळ संपल्यानंतर किंवा रात्री 10 नंतर येतात त्यांच्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत मसालेभात सेवा उपलब्ध करून दिली जातेय. त्यामुळे भक्तांना मोठा दिलासा मिळतोय.(अमिता शिंदे, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
गजानन महाराजांच्या दर्शनाला शेगावला जाताय? प्रवास, निवास अन् सर्व प्रश्नांची उत्तरं इथं पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल