TRENDING:

Vat Purnima 2025 Ukhane : नाव घे सावित्री लाजू नको, वटपौर्णिमेसाठी एकापेक्षा एक भन्नाट उखाणे

Last Updated:
Vat purnima ukhane in marathi : महाराष्ट्रात सणवार म्हटलं की उखाणेही आलेच. महाराष्ट्रातील विवाहिती महिलांसाठी खास असलेला सण म्हणजे वटपौर्णिमा. यादिवशी घेता येतील असे सोपे आणि एकापेक्षा एक हटके उखाणे.
advertisement
1/7
नाव घे सावित्री लाजू नको, वटपौर्णिमेसाठी एकापेक्षा एक भन्नाट उखाणे
वटपौर्णिमा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण. विवाहित महिला यादिवशी उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करून सात जन्मी हाच पती मिळू दे असं म्हणत पतीच्या दीर्घायुष्याचीही प्रार्थना करतात. आता सणवार म्हटलं की उखाणेही आलेच. वटपौर्णिमेसाठी खास उखाणे.
advertisement
2/7
वटवृक्षाच्या झाडाला, प्रदक्षिणा घातल्या सात, _________ रावांचे नाव घेते, आपल्या सर्वांचे असुदे आमच्यावर आशीर्वादाचे हात.
advertisement
3/7
वट सावित्रेला नमन करते, तुझ्या सृष्टी मुळे आनंदी आहे मनुष्य, _______________ रावांचे नाव घेते, त्यांना मिळूदे 100 वर्ष आयुष्य.
advertisement
4/7
वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला, गुंडाळतात धागा, __________ रावांसाठी माझ्या मनात कधीही, कमी नाही होणार जागा.
advertisement
5/7
आजच्या दिवशी, वडाची पूजा करण्याची आहे प्रथा, ________ रावांसोबत ऐकेन मी, सावित्री आणि सत्यवानाची कथा.
advertisement
6/7
सण आहे आज वटपौर्णिमेचा, _______ रावांसोबत असाच, संसार राहूदे सुखाचा.
advertisement
7/7
आज वटपौर्णिमा म्हणून, सात फेरे मारते मी वडाला. सातही जन्मी मिळूदे _____ रावांसारखे पती, असे मागणे मागते देवाला. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Vat Purnima 2025 Ukhane : नाव घे सावित्री लाजू नको, वटपौर्णिमेसाठी एकापेक्षा एक भन्नाट उखाणे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल