Weight Loss : कशाला हवं डाएट फूड! 8 भारतीय पदार्थ जे खाल्ल्याने कमी होतं वजन
- Published by:Priya Lad
Last Updated:
Weight Loss Indian Recipe : सामान्यपणे भारतीय पदार्थ म्हणजे वजन वाढवणारे असाच समज आहे. पण असे काही इंडियन फूड आहेत जे खाल्ल्याने वजन कमी होतं.
advertisement
1/9

वजन घटवायचं म्हटलं की अनेक जण डाएट करतात आणि डाएटच्या नावाने वजन वाढेल म्हणून कितीतरी भारतीय पदार्थ खाणंच सोडून देतात. पण तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
2/9
असे काही भारतीय पदार्थ आहेत जे खाल्ल्याने वजन कमी होतं. हे भारतीय पदार्थ डाएट फूडपेक्षा कमी नाही. या संपूर्ण पदार्थांची लिस्ट.
advertisement
3/9
मूग डाळीचं धिरडं : मूग डाळीपासून बनवलेलं धिरडं, पॅनकेक किंवा पोळा. जो प्रथिने आणि फायबरने समृद्ध आहे. हे खाल्ल्यानंतर तुमचं पोट जास्त काळ भरलेलं राहतं, तसंच हे चयापचय वाढवतं.
advertisement
4/9
मिक्स व्हेजिटेबल करी : ऋतुनुसार मिळणाऱ्या भाज्या एकत्र करून कमीत कमी तेलात शिजवल्या की त्यातील फायबर, जीवनसत्त्वं आणि अँटिऑक्सिडंट्स पचनास मदत करतात.
advertisement
5/9
पालक सूप : आयर्न आणि अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण पालकाचं सूप डिटॉक्सिफायिंग आणि चयापचय वाढवण्यासाठी उत्तम आहे.
advertisement
6/9
बेसन पोळा : चण्याच्या पिठापासून बनवलेलं प्रोटियुक्त पॅनकेक वजन नियंत्रणात मदत करतं आणि भूक कमी करतं.
advertisement
7/9
काकडीचं रायतं : काकडीसह ताजं दही एक साइड डिश, जी पचनास मदत करते आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी प्रोबायोटिक्स पुरवते.
advertisement
8/9
मसूर डाळ सूप : प्रोटिन आणि फायबरयुक्त हलकं आणि पौष्टिक सूप, जे भूक आणि वजन कमी करण्यास मदत करतं.
advertisement
9/9
स्प्राउट्स सलाड : स्प्राऊटेड कडधान्य, ताज्या भाज्या आणि त्यावर लिंबू हे मिश्रण. यात कॅलरी कमी, पोषक तत्वांचं प्रमाण जास्त असतं आणि हे चयापचयासाठी उत्तम आहे. (सर्व फोटो : AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Weight Loss : कशाला हवं डाएट फूड! 8 भारतीय पदार्थ जे खाल्ल्याने कमी होतं वजन