TRENDING:

Health Risk Of The Day : कलिंगड मीठ लावून खाल्ल्याने काय होतं?

Last Updated:
Salt on watermelon : उन्हाळा म्हटलं की कलिंगड आलंच. लालबुंद, रसरशीत कलिंगड मीठ लावून खाण्याची मजा काही औरच. पण मीठ लावून कलिंगड खाणं चांगलं की वाईट, याचे काय परिणाम होतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
1/7
Health Risk Of The Day : कलिंगड मीठ लावून खाल्ल्याने काय होतं?
उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. मीठ त्याची कमतरता भरून काढण्यात मदत करतात. पण मिठाचं अधिक सेवन हानिकारक आहे.
advertisement
2/7
जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकन हार्ट असोसिएशन दोघांनीही मिठाचं अधिक सेवन उच्च रक्तदाबाचा धोका असल्याचं सांगितलं आहे. अधिक मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो. जो हृदय रोग आणि स्ट्रोकचा धोका वाढवतो.
advertisement
3/7
काही अभ्यासाच्या मते, मिठाचं अधिक सेवन किडनीवर दबाव टाकू शकतं. किडनीचे आजार होऊ शकतात. ज्यांना आधीपासूनच किडनीची समस्या आहे, त्यांच्यासाठी चिंता अधिक वाढू शकते.
advertisement
4/7
काही लोकांना मीठ लावून कलिंगड खाल्ल्याने गॅस, मळमळ, अॅसिडीटी अशा पचनसंबंधी समस्या होऊ शकता. मिठामुळे शरीरात पाणी वाढू शकतं, ज्यामुळे सूज आणि इतर समस्या होऊ शकतात.
advertisement
5/7
मीठ लावून कलिंगड खाण्याबाबत ठोस वैद्यकीय संशोध नाही. पण तज्ज्ञांच्या मते कलिंगडात पोटॅशिअम आहे, जे एक इलेक्ट्रोलाइट आहे आणि मिठात सोडियम असतं जे पोटॅशिअम सोबत मिळून शरीरातील द्रव संतुलन राखण्यात मदत करतं.
advertisement
6/7
मीठ लावून कलिंगड खाण्याबाबत डॉक्टरांची मतंही वेगवेगळी असू शकतात. पण रिसर्च आणि डॉक्टरही मिठाचं मर्यादित प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला देतात. विशेषतः ज्यांना उच्च रक्तदाब, किडनीचे आजार आणि हृदयरोग आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी.
advertisement
7/7
त्यामुळे कलिंगडाला मीठ लावून खाण्याबाबत माहिती नाही पण मीठाचं सेवन जास्त झालं तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला कोणत्या आरोग्याच्या समस्या असतील तर कलिंगड मीठ लावून खाण्याआधी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. (सर्व फोटो : AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Risk Of The Day : कलिंगड मीठ लावून खाल्ल्याने काय होतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल