What Is Bornhan : मकर संक्रांतीला लहान मुलांचे 'बोरन्हाण' करण्याला असते विशेष महत्त्व! पाहा कसे आणि का करायचे?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
What Is Bornhan : मकर संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांना बोरन्हाण घालण्याची प्रथा आहे. बऱ्याच लोकांना माहित नसते आणि नेमके हे कशासाठी करायचे हेही काही लोकांना ठाऊक नाही. म्हणूनच मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज आम्ही तुमच्यासाठी हि विशेष माहिती घेऊन आलो आहोत. चला जाणून घेऊया याबद्दल सर्वकाही.
advertisement
1/7

बोरन्हाण हा शिशुसंस्कार बहुतांश लोकांना परिचित आहे. या निसर्गाशी आणि बदलत्या ऋतुमानाशी जुळवून घेत शारीरक आरोग्य राखण्यासाठी हा सोहळा साजरा केला जातो. बोरन्हाण घालताना त्यात बाळाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या आणि लहान मुलांना आवडणाऱ्या वस्तूंचा समावेश केला जातो. अगदी तान्ह्या बाळापासून ते पाच वर्षांपर्यंत मुलांचे बोरन्हाण केले जाते. या सोहळ्यातून बाळाची संस्कृतीशी, परंपरेशी आणि निसर्गाशी ओळख व्हावी हा यामागचा उद्देश असतो.
advertisement
2/7
बोरन्हाण म्हणजे काय? : बोरन्हाण म्हणजेच निसर्गातील वेगवेगळ्या वस्तूंनी बाळाला आंघोळ घातली जाते. या वस्तूंमध्ये बाळाला इजा होणार नाही अशा हलक्या आणि आरोग्यदायी वस्तूंचा समावेश केला जातो. यात लाह्या, चुरमुरे, चिंचा, बोरं, भुईमुगाच्या शेंगा आणि गाजराचे तुकडे अशा नैसर्गिंक वस्तूंसोबत लहान मुलांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या गोळ्या, चॉकलेट आणि बिस्कीटांचाही वापर केला जातो.
advertisement
3/7
या सोहळ्यामुळे बाळाचा या वस्तूंसोबत परिचय होतो आणि त्याला त्या अतिशय गमतीशीर वाटू लागतात. तसेच या सोहळ्यात इतर लहान मुलांनाही आमंत्रित केले जाते. त्यामुळे बाळाची त्यांच्यासोबत ओळख होते आणि हा सोहळा त्याच्या कायम आठवणीत राहतो.
advertisement
4/7
बोरन्हाण हा एक अतिशय उत्साह वाढवणारा आणि नाती जपणारा आनंददायी सोहळा असतो. त्यामुळे या सोहळ्यासाठी बाळाला आकर्षक पोषाक परिधान केला जातो. मुलांना काळ्या रंगाचे कपडे आणि मुलांना खणाचा फ्रॉक घातला जातो. या दिवशी काळ्या रंगांच्या कपड्यांना महत्व दिले जाते.
advertisement
5/7
मकरसंक्रांतीचा दिवस हा हिवाळ्यातील सर्वांत थंड दिवस मानला जातो. त्यामुळे उष्णता शोषूण शरीर उबदार ठेवणाऱ्या काळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर केला जातो. तसेच या काळ्या रंगावर बाळाला शोभून दिसेल असेल पांढरे दागिने घातले जातात. यात हार, मुकूट, पैंजण, कडे, बांगड्या, वाळ्या अशा अनेक दागिण्यांचा समावेश असतो.
advertisement
6/7
बोरन्हाण सोहळ्याचे महत्त्व : बोरन्हाण हा बाळाचा सोहळा असला तरी तो मोठ्यांसाठी देकील तेवढाच महत्त्वाचा असतो. या सोहळ्याच्या निमित्ताने स्त्रिया आपल्या मुलांना घेऊन घरी आलेल्या लेकुरवाळ्यांचाही हळद कुंकू लावून सन्मान करतात. तसेच तीळ-गुळासह जेवण आणि गोडाचे पदार्थ देऊन त्यांचे आदरातिथ्य केले जाते.
advertisement
7/7
या सोहळ्यानिमित्त नातेवाईक आणि मित्रमंडळी घरी येतात आणि यानिमित्ताने त्यांच्या गप्पा-गोष्टी रंगतात. हा समारंभ घरगुती असतो परंतु घरी गजबज असल्याने तो अतिशय उत्साही आणि आनंद देणारा असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
What Is Bornhan : मकर संक्रांतीला लहान मुलांचे 'बोरन्हाण' करण्याला असते विशेष महत्त्व! पाहा कसे आणि का करायचे?