TRENDING:

Empty Nest Divorce : कपल्समध्ये वाढतंय एम्प्टी नेस्ट डिवोर्सचं प्रमाण! घटस्फोटाच्या या नव्या टर्मचा नेमका अर्थ काय?

Last Updated:
What Is Empty Nest Divorce : हल्ली डिवोर्स म्हणजेच घटस्फोट घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. पूर्वी खूप मोठमोठी कारणं असतील तेव्हा डिवोर्सचा विचार व्हायला पण आता छोटाश्या करणानेही डिवोर्स घेतले जातात. त्यामुळे आता डिवोर्सचीची वेगवेगळी नावं आणि व्याख्या समोर येत आहेत. आज आम्ही तुम्हाला एम्प्टी नेस्ट डिवोर्स म्हणजे काय. याबद्दल माहीत देत आहोत.
advertisement
1/9
कपल्समध्ये वाढतंय एम्प्टी नेस्ट डिवोर्सचं प्रमाण! पण या नव्या टर्मचा अर्थ काय?
डिवोर्स कोणत्याही वयात घेतला जाऊ शकतो. मात्र वेगवेगळ्या वयातील किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे घेतल्या जाणारी डिवोर्सला लोक हल्ली वेगवेगळी नाव देतात किंवा काही टर्म आधीच अस्तित्त्वात असतात, पण आपल्याला आता त्या जास्त ऐकायला मिळत आहेत.
advertisement
2/9
अशीच एक टर्म आहे ती म्हणजे, एम्प्टी नेस्ट डिवोर्स. याच्या नावावरूनच तुम्हाला अंदाज येऊ शकतो. हा डिवोर्स नवविवाहित जोडप्यांच्या किंवा काहीच वर्ष झालेल्या जोडप्याच्या डिवोर्सबद्दल वापरला अजात नाही.
advertisement
3/9
एखादे जोडपे ज्यांच्या लग्नाला 20-30 वर्ष झाली आहेत, त्यांची मुलंही आता शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घराबाहेर गेलेली आहेत. जेव्हा हे जोडपेच फक्त घरात असते. त्यांची काही कारणास्तव एकमेकांसोबत एकत्र राहण्याची इच्छा नसल्यास ते डिवोर्स घेतात, यालाच एम्प्टी नेस्ट डिवोर्स म्हणतात.
advertisement
4/9
एम्प्टी नेस्ट यासाठी, कारण घरात केवळ ते जोडपेच असते त्यांची मुलं घराबाहेर वेगळ्या ठिकाणी राहत असतात. अशा परिस्थिती वेगळे होणे म्हणजे एम्प्टी नेस्ट डिवोर्स. अशी साधारणपणे त्याची व्याख्या होऊ शकते.
advertisement
5/9
अशी जोडपी साधारणपणे 50 ते 60 च्या वयात असतात. खरं तर या वयात डिवोर्स घेण्याचं प्रमाण नुकताच वाढलं आहे. या घटस्फोटाची काही महत्त्वाची कारणं आहेत. त्याबद्दलही जाणून घेऊया.
advertisement
6/9
काहीवेळा जोडप्यांमध्ये गोष्टी आधीपासूनच बीहडलेल्या असतात. पणमुलं त्यांना जोडून ठेवण्याचे काम करता किंवा मुलांसाठीच ते एकत्र राहात असतात. अशावेळी जेव्हा मुलं घराबाहेर पडतात, तेव्हा जोडप्यांमध्ये अधिक अंतर यायला सुरुवात होते.
advertisement
7/9
बऱ्याच जोडप्यांना आपली अधुरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा द्यायचा असतो. काहीवेळा दोघांचीही स्वप्न वेगवेगळी असतात आणि त्यासाठी त्यांना वेगळा व्हावं लागतं. शिवाय मुलांची जबाबदारी नसल्याने या काळात वेगळं होण्याचं निर्णय घेणं सोपं जात.
advertisement
8/9
ही परिस्थिती टाळण्यासाठी जोडप्यांना पुन्हा एकमेकांचे मित्र होण्याची गरज आहे. एकत्र नवीन छंद जोपासणे, मोकळेपणाने संवाद साधणे, तुमच्या भावना आणि इच्छा व्यक्त करणे, एकमेकांना वैयक्तिक छंद जोपासण्यास प्रोत्साहित करणे आणि सपोर्ट करणे. या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या गेल्या पाहिजे.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Empty Nest Divorce : कपल्समध्ये वाढतंय एम्प्टी नेस्ट डिवोर्सचं प्रमाण! घटस्फोटाच्या या नव्या टर्मचा नेमका अर्थ काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल