1 लाख डाउन पेमेंटवर खरेदी करु शकता Maruti Alto K10! फक्त एवढा येईल EMI
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Maruti Alto K10 च्या STD आणि VXI व्हेरिएंट कमी बजेटमध्ये शानदार फीचर्ससह येतो. चला याची किंमत, मायलेज, फीचर्स आणि पूर्ण फायनेन्स डिटेल्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
1/7

तुम्हाला कमी बजेटमध्ये नवी कोरी कार खरेदी करायची असेल तर Maruti Suzuki Alto K10 तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरु शकतो. ही कार कमी किंमत, चांगलं मायलेज आणि शहरात सहज ड्रायव्हिंगसाठी ओळखली जाते. तुम्हाला ही कार 1 लाखांची डाउन पेमेंट देऊन खरेदी करायची असेल तर पाहूया तुम्हाला दरमहा किती ईएमआय द्यावा लागेल.
advertisement
2/7
Alto K10 STD व्हेरिएंटच्या EMI डिटेल्स : Maruti Alto K10 च्या बेस मॉडल STD (पेट्रोल)ची एक्स-शोरुम किंमत 3,69,900 रुपये आहे. दिल्लीमध्ये याची ऑन-रोड किंतम जवळपास 4,32,836 रुपये होते.
advertisement
3/7
तुम्ही 1 लाख डाउन पेमेंट दिले तर तुम्हाला 3,32,836 रुपयांच लोन घ्यावं लागेल. हे लोन 5 वर्षांसाठी 9 टक्के व्याजदरावर मिळाले तर तुमचा मासिक ईएमआय 6,909 रुपये होईल. पूर्ण 5 वर्षात तुम्हाला जवळपास 81,712 रुपये व्याजाच्या रुपात फेडावे लागतील.
advertisement
4/7
Alto K10 VXI व्हेरिएंटसाठी EMI डिटेल्स : Alto K10 VXI (पेट्रोल) प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 4,49,900 रुपये आहे. दिल्लीमध्ये त्याची ऑन-रोड किंमत अंदाजे 5,21,725 रुपये आहे. तुम्ही या व्हेरिएंटवर 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला 4,21,725 रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. बँक 5 वर्षांसाठी 9% व्याजदराने कर्ज देत असेल, तर तुमचा EMI दरमहा अंदाजे 8,754 रुपये असेल. या कालावधीत, तुम्हाला एकूण 1,03,534 रुपये व्याज द्यावे लागेल.
advertisement
5/7
किंमत आणि व्हेरिएंट : Maruti Alto K10 ची एक्स-शोरुम किंमत 3.70 लाख रुपयांपासून सुरु होऊन 5.45 लाख रुपयांपर्यंत जाते. ही STD, LXi, VXi आणि VXi Plus व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. ग्राहक आपले बजेट आणि गरजेनुसार योग्य मॉडल निवडू शकतात.
advertisement
6/7
इंजिन, फीचर्स आणि सेफ्टी : या कारमध्ये 1-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन आहे जे 67 PS पॉवर आणि 89 Nm टॉर्क निर्माण करते. ते 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड एएमटी गिअरबॉक्ससह खरेदी करता येते. कंपनीच्या मते, ते पेट्रोलवर 24.39 किमी/लीटर आणि सीएनजीवर 33.40 किमी/किलो इंधन कार्यक्षमता देते.
advertisement
7/7
Alto K10 मध्ये 7-इंच टचस्क्रीन, कीलेस एंट्री, सेमी-डिजिटल मीटर, स्टीअरिंग कंट्रोल्स, ड्युअल एअरबॅग्ज, ईबीडीसह एबीएस, रिव्हर्स कॅमेरा आणि मागील पार्किंग सेन्सर्स यासारख्या आवश्यक फीचर्ससह येते.