Lemon Water : लेमन वॉटर कधी प्यायचं, लिंबूपाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Best Time to drink lemon water : उन्हाळ्यात लिंबूपाणी आरोग्यासाठी चांगलं. पण तुम्हाला लिंबूपाण्याचे पूर्ण फायदे घ्यायचे असतील तर ते योग्य वेळी प्यायलं हवं. आता ही योग्य वेळ काय आहे ते पाहुयात.
advertisement
1/7

उन्हाळा म्हटलं की लिंबूपाणी आलंच. उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणं आरोग्यदायी मानलं जातं. हे शरीराला हायड्रेट ठेवतं आणि ऊर्जा देखील देतं.
advertisement
2/7
लिंबूमध्ये पेक्टिन फायबर असतं जे भूक नियंत्रित करतं आणि शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी लिंबूपाणी प्रभावी आहे.
advertisement
3/7
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण चांगलं असतं. ज्यामुळे त्वचा चमकदार आणि स्वच्छ होते. त्यामुळे लिंबूपाणी त्वचेसाठी फायदेशीर आहे. लिंबूमधील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
advertisement
4/7
पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी लिंबूपाणी चांगलं. यामुळे गॅस, अपचन यासारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
advertisement
5/7
लिंबूपाणी यकृत स्वच्छ करतं, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास प्रभावी ठरू शकते. त्यामुळे हे शरीरातील विषारीपणा कमी करते.
advertisement
6/7
पण जर तुम्हाला लिंबूपाण्याचे पूर्ण फायदे घ्यायचे असतील तर ते योग्य वेळी प्यायलं हवं. लिंबू पाणी पिण्याचे फयदे आणि ते कोणत्यावेळी प्यावं ते पाहुयात.
advertisement
7/7
लिंबू पाणी पिण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी रिकाम्या पोटी. कोमट पाण्यात लिंबू आणि थोडं मध मिसळून पिणं सर्वात फायदेशीर मानलं जातं. यामुळे शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. याशिवा व्यायामापूर्वी आणि व्यायामानंतरही लिंबूपाणी पिणं फायद्याचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Lemon Water : लेमन वॉटर कधी प्यायचं, लिंबूपाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?