TRENDING:

Kitchen Tips : एअर फ्रायरमध्ये काही भांडी वापरणं ठरू शकता घातक! तुम्ही 'ही' चूक तर करत नाही ना?

Last Updated:
Which utensils are not safe to use in air fryer : हल्ली मायक्रोवेव्ह ओव्हनपेक्षा लोक एअर फ्रायर वापरणं पसंत करतात. कारण त्यामध्ये मायक्रोवेव्हमध्ये बनणारे जवळपास सर्व पदार्थ बानू शकतात आणि ते त्यापेक्षा जास्त सुरक्षित मानलं जातं. पण तुम्हाला माहितीये एअर फ्रायरमध्ये काही भांडी वापरणं धोक्याचं आहे. आज आम्ही तुम्हाला याबद्दलच सविस्तर माहिती देणार आहोत.
advertisement
1/7
एअर फ्रायरमध्ये काही भांडी वापरणं ठरू शकता घातक! तुम्ही 'ही' चूक तर करत नाही ना?
एअर फ्रायरमध्ये काही भांडी वापरणं आपल्यासाठी घातक ठरू शकतं. आज आम्ही तुम्हाला एअर फ्रायर वापरतं काय काळजी घ्या, त्यामध्ये कोणती भांडी वापरावी, कोणती वापरून नये, त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात. याबद्दल माहिती देत आहोत.
advertisement
2/7
सर्वात आधी बोलूया अॅल्युमिनियमबद्दल. साधारणपणे ही भांडी आपण एअर फ्रायरमध्ये वापरू शकतो. ही भांडी एअर फ्रायरसाठी सुरक्षित मानली जातात. कारण ती सर्वत्र सामान उष्णता देतात. यामुळे या भांड्यांमध्ये केक, ब्राउनीज किंवा बेक्ड स्नॅक्स चांगले बनतात. ही भांडी वजनाला हलकी असल्याने ती एअर फ्रायर बास्केटवर जास्त दबाव टाकत नाहीत. फक्त हवा खेळती राहण्यासाठी ती योग्य आकाराची असावी.
advertisement
3/7
यानंतर येते स्टेनलेस स्टील. एअर फ्रायर तुम्ही स्टेनलेस स्टीलची भांडीही वापरू शकता. स्टील मजबूत असते आणि तेदेखील उच्च तापमान सहन करू शकते. फक्त कंटेनर खूप जाड आणि जड नसावे. एअर फ्रायरमध्ये उष्णता पसरण्यात अडथळा येऊ नये याची खात्री करा.
advertisement
4/7
त्यानंतर सिरेमिक आणि पोर्सिलेन कंटेनर हेदेखील एअर फ्रायरसाठी सुरक्षित असतात. मात्र त्याला सोने किंवा इतर धातूचे कोटिंग नसावे. कंटेनरवर मायक्रोवेव्ह सेफ असे लेबल असेल, तर ते एअर फ्रायरमध्ये वापरले जाऊ शकते.
advertisement
5/7
तुम्ही एअर फ्रायरमध्ये अॅल्युमिनियम फॉइल, बेकिंग पेपर आणि एअर फ्रायर लाइनर्स वापरू शकता. यामुळे अन्न आतमध्ये चिकटत नाही. त्याचबरोबर तुम्ही एअर फ्रायरमध्ये सिलिकॉन मोल्ड्स आणि ट्रेदेखील वापरू शकता. ते उष्णता-प्रतिरोधक असतात आणि केक, मफिन किंवा कपकेक बनवण्यासाठी बेस्ट असतात. मात्र नेहमी फूड-ग्रेड सिलिकॉन वापरा, जे उच्च तापमान सहन करू शकते.
advertisement
6/7
आता पाहुयात एअर फ्रायरमध्ये तुम्ही कोणती भांडी वापरू नये. एअर फ्रायरमध्ये पातळ काचेची भांडी, प्लास्टिकचे कंटेनर किंवा सोने-चांदीचे कोटिंग असलेली भांडी वापरू नये. कारण एअर फ्रायरमधील तीव्र उष्णतेत ते तुटू शकतात किंवा वितळू शकतात.
advertisement
7/7
फ्रायरमध्ये ही भांडी वापरल्याने अन्न तर खराब शिवाय एअर फ्रायरलाही नुकसान पोहोचू शकते. म्हणून योग्य धातूची भांडी वापरा. तसेच योग्य आकाराची भांडी वापरा, जेणेकरून फ्रायरमध्ये हवा खेळती राहिलो आणि तुमचे पदार्थ सुरक्षितरित्या बनून तयार होती. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : एअर फ्रायरमध्ये काही भांडी वापरणं ठरू शकता घातक! तुम्ही 'ही' चूक तर करत नाही ना?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल