TRENDING:

Onion : कांदा चिरताना डोळ्यात पाणी का येतं? 99% लोक चुकीचं कारण मानतात

Last Updated:
कांदा कापताना डोळ्यात पाणी येण्यामागे ना तिखटपणा कारणीभूत आहे, ना त्याचा वास. यामागे एक रंजक 'रासायनिक युद्ध' दडलं आहे. नक्की काय घडतं कांदा कापताना? जाणून घेऊया या लेखात.
advertisement
1/9
Onion : कांदा चिरताना डोळ्यात पाणी का येतं? 99% लोक चुकीचं कारण मानतात
कांदा चिरताना डोळ्यात पाणी येणं ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. पण यामागील खरं शास्त्रीय कारण काय? यावर विचारलं तर 99% लोक म्हणतात की, "कांदा तिखट असतो म्हणून पाणी येतं" किंवा "कांद्याचा वास तीव्र असतो म्हणून डोळे चुरचुरतात." पण मित्रांनो, हे उत्तर पूर्णपणे चुकीचं आहे.
advertisement
2/9
कांदा कापताना डोळ्यात पाणी येण्यामागे ना तिखटपणा कारणीभूत आहे, ना त्याचा वास. यामागे एक रंजक 'रासायनिक युद्ध' दडलं आहे. नक्की काय घडतं कांदा कापताना? जाणून घेऊया या लेखात.
advertisement
3/9
स्वयंपाकघरात कांदा चिरणं हे कसब मानलं जातं. पण कितीही सराव असला तरी कांदा चिरताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतातच. अनेकदा लोक म्हणतात की कांद्यातून गॅस बाहेर पडतो, पण तो गॅस नेमका कोणता आणि तो डोळ्यांपर्यंत कसा पोहोचतो, याची खरी माहिती फार कमी लोकांना असते.
advertisement
4/9
1. कांद्याची 'स्वसंरक्षण' यंत्रणाकांदा हा जमिनीच्या खाली वाढतो. स्वतःला किडे किंवा प्राण्यांपासून वाचवण्यासाठी कांद्याकडे एक नैसर्गिक यंत्रणा असते. जेव्हा आपण चाकूने कांदा कापतो, तेव्हा त्याच्या पेशी (Cells) फुटतात. या पेशी फुटल्यामुळे कांद्यामध्ये असलेले 'अलाईनेज' (Alliinase) नावाचे एन्झाइम्स बाहेर पडतात.
advertisement
5/9
2. हवेत तयार होणारं केमिकल 'युद्ध'कांदा कापल्यानंतर हे एन्झाइम्स पिठातील अमिनो ॲसिड सल्फोक्साइड्ससोबत प्रक्रिया करतात आणि त्यातून 'सिन-प्रोपॅनथियल-एस-ऑक्साइड' (Syn-propanethial-S-oxide) नावाचा वायू (Gas) तयार होतो. हा वायू अत्यंत अस्थिर असतो आणि तो हवेत वेगाने पसरतो.
advertisement
6/9
3. डोळ्यांशी संपर्क आणि सल्फ्यूरिक ॲसिडजेव्हा हा गॅस हवेच्या माध्यमातून आपल्या डोळ्यांच्या संपर्कात येतो, तेव्हा तो डोळ्यांमधील ओलाव्याशी (पाण्याशी) प्रक्रिया करतो. या प्रक्रियेतून अतिशय सौम्य प्रमाणात 'सल्फ्यूरिक ॲसिड' तयार होतं. हे ॲसिड डोळ्यांना टोचू लागतं आणि डोळ्यांची आग होऊ लागते.
advertisement
7/9
4. अश्रू का येतात?डोळ्यांना जेव्हा या ॲसिडची जळजळ जाणवते, तेव्हा आपला मेंदू डोळ्यांमधील अश्रू ग्रंथींना (Lachrymal Glands) संदेश पाठवतो. हे ॲसिड धुवून काढण्यासाठी डोळ्यांतून पाणी म्हणजेच अश्रू बाहेर पडतात. म्हणजेच, डोळ्यांतून पाणी येणं ही खरं तर आपल्या डोळ्यांची 'डिफेन्स सिस्टीम' आहे.
advertisement
8/9
कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून 'या' सोप्या टिप्स वापराजर तुम्हालाही कांदा रडवतोय असं वाटत असेल, तर पुढच्या वेळी या पद्धती वापरून पहाकांदा कापण्यापूर्वी 15-20 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यामुळे कांद्यातील रासायनिक प्रक्रिया मंदावते आणि गॅस कमी बाहेर पडतो.कांदा पाण्यात ठेवून किंवा वाहत्या पाण्याखाली कापल्यास वायू हवेत पसरण्याऐवजी पाण्यात विरघळतो.कांदा कापताना तोंडात पाण्याचा घोट धरून ठेवल्याने डोळ्यांतून पाणी येत नाही, असं अनेकजण मानतात (मात्र यामागे ठोस वैज्ञानिक पुरावा नाही, पण अनेकांना याचा फायदा होतो).चाकू जितका जास्त धारदार असेल, तितक्या कांद्याच्या पेशी कमी प्रमाणात डॅमेज होतात आणि गॅस कमी निघतो.पंखा लावून कांदा कापल्यास तयार होणारा गॅस डोळ्यांपर्यंत न पोहोचता दुसऱ्या दिशेला वाहून जातो.
advertisement
9/9
कांदा तुम्हाला मुद्दाम रडवत नाही, तर तो स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुमचं शरीर त्यापासून संरक्षण करण्यासाठी अश्रू बाहेर टाकतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Onion : कांदा चिरताना डोळ्यात पाणी का येतं? 99% लोक चुकीचं कारण मानतात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल