TRENDING:

Interesting Facts : मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? कधी आणि कशी सुरु झाली ही प्रथा? वाचा रंजक कारण

Last Updated:
Why kites are flown on Makar Sankranti : मकर संक्रांती म्हणलं की तिळगूळ, गोडधोड आणि आकाशात रंगीबेरंगी पतंगांची गर्दी डोळ्यांसमोर येते. भारतातील अनेक भागांमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची खास परंपरा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या दिवशी छतावर किंवा मोकळ्या मैदानात जमून पतंगबाजीचा आनंद घेतात. पण ही परंपरा नेमकी कशी आणि का सुरू झाली, यामागे कोणते रहस्य दडलेले आहेत, याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत.
advertisement
1/7
मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? कधी आणि कशी सुरु झाली ही प्रथा? वाचा रंजक कारण
मकर संक्रांतीचा काळ हिवाळ्यात येतो, जेव्हा थंडीमुळे शरीर सुस्त झालेलं असतं. अशा वेळी पतंग उडवण्यामागे एक महत्त्वाचे वैज्ञानिक आणि आरोग्याशी संबंधित कारण आहे. सकाळी आणि दुपारच्या वेळची कोवळी सूर्यकिरणं शरीरासाठी अत्यंत उपयुक्त मानली जातात. पतंग उडवण्याच्या निमित्ताने लोक बराच वेळ उन्हात घालवतात, ज्यामुळे शरीराला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन-डी मिळतं.
advertisement
2/7
सूर्यप्रकाशामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. हिवाळ्यात कमी हालचाल होते. पण पतंग उडवताना हात, डोळे आणि संपूर्ण शरीर सक्रिय राहते. त्यामुळे हा खेळ एक प्रकारचा व्यायामच ठरतो, जो शरीराला ऊर्जावान बनवतो.
advertisement
3/7
पतंग उडवण्यामागे धार्मिक आणि पौराणिक कथाही सांगितल्या जातात. काही मान्यतेनुसार, भगवान श्रीरामांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवला होता आणि तो थेट इंद्रलोकापर्यंत गेला होता. तेव्हापासून या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा सुरू झाली, असे मानले जाते. त्यामुळे पतंग उडवणे हे शुभ मानले जाते.
advertisement
4/7
पतंग हे आनंद, स्वातंत्र्य आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. जसा पतंग वाऱ्याच्या विरोधात जाऊन आकाशात उंच भरारी घेतो, तसंच माणसानेही अडचणींवर मात करून पुढे जायला हवं, हा संदेश या परंपरेतून मिळतो. जीवनात येणाऱ्या चढ-उतारांमध्येही आनंद शोधण्याची शिकवण पतंगबाजी देत असते.
advertisement
5/7
'काई पो छे! किंवा 'पतंग कापली' अशा जल्लोषात लोक आपले भेद विसरून एकत्र येतात. जात, धर्म, वय यांचा फरक न करता सगळेच या खेळात सहभागी होतात. पतंग उडवणे हा केवळ खेळ नसून लोकांना जोडणारा एक उत्सव आहे.
advertisement
6/7
म्हणूनच मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा केवळ करमणुकीपुरती मर्यादित नाही. ती आरोग्य, श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सकारात्मक विचार यांचा सुंदर संगम आहे. आकाशात उडणाऱ्या प्रत्येक पतंगासोबत आनंद, आशा आणि नव्या सुरुवातींचा संदेशही उंच झेप घेत असतो.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Interesting Facts : मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? कधी आणि कशी सुरु झाली ही प्रथा? वाचा रंजक कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल