Train Accident : खाली ट्रेन, वर क्रेन! 22 प्रवाशांचा भयानक मृत्यू; रेल्वे अपघाताचे थरकाप उडवणारे PHOTO
- Published by:Priya Lad
Last Updated:
Thailand Crane Fall On Train : धावत्या ट्रेनवर क्रेन कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. शोधकार्य आणि बचावकार्य सुरू आहे.
advertisement
1/5

एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. क्रेन ट्रेनवर कोसळली आहे. यामुळे ट्रेन रूळांवरून घसरली. ज्यामध्ये किमान 22 जणांचा मृत्यू झाला आणि 30 हून अधिक जण जखमी झाले.
advertisement
2/5
थायलंडमध्ये घडलेली ही धक्कादायक घटना. बुधवारी सकाळी राजधानी बँकॉकपासून सुमारे 230 किलोमीटर ईशान्येला असलेल्या सिखिओ जिल्ह्यात हा अपघात झाला.
advertisement
3/5
नाखोन रत्चासिमा प्रांतीय पोलीस प्रमुख थाचापोन चिन्नावोंग यांनी एएफपीला सांगितलं की, या अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.
advertisement
4/5
प्रवासी ट्रेन बँकॉकहून उबोन रत्चाथानी प्रांताकडे जात होती. चालत्या ट्रेनवर एलिव्हेटेड हाय-स्पीड रेल्वे बांधण्यासाठी वापरण्यात येणारी क्रेन पडली, ज्यामुळे ट्रेन रुळावरून घसरली आणि तिला आग लागली.
advertisement
5/5
नाखोन रत्चासिमा जनसंपर्क विभागाच्या म्हणण्यानुसार, आग आटोक्यात आणण्यात आली आहे आणि बचाव कर्मचारी आत अडकलेल्यांचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
Train Accident : खाली ट्रेन, वर क्रेन! 22 प्रवाशांचा भयानक मृत्यू; रेल्वे अपघाताचे थरकाप उडवणारे PHOTO