बायकोचे पाय थंडगार आणि नवऱ्याचे ऊबदार; थंडीत कपलच्या शरीराचं तापमान वेगळं का? संशोधनात समजलं Interesting कारण
- Published by:Priya Lad
Last Updated:
जर तुम्ही विवाहित असाल, तर तुमच्या लक्षात आलं असेल की या काळात थंडीच्या काळात बायकोचे पाय अनेकदा थंड असतात, तर नवऱ्याचे पाय उबदार असतात. त्यामागे विज्ञान आहे.
advertisement
1/7

सध्या चांगलीच थंडी पडली आहे. थंडी म्हणजे आपलं शरीरही थंडगार पडतं. पण तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला एक विचित्र गोष्ट जाणवली असेल की बायकोचे हातपाय थंडगार पडलेले असतील आणि नवऱ्याचे मात्र ऊबदार असतील. थंडीत कपलमधील शरीराचं तापमान असं वेगळं का असतं? याबाबत अभ्यास करण्यात आला आणि संशोधनात इंटरेस्टिंग कारण समोर आलं आहे.
advertisement
2/7
हिवाळ्यात महिलांचे हात आणि पाय लवकर थंड का होतात, तर पुरुषांचे हात आणि पाय उबदार का राहतात.हा एक शारीरिक फरक आहे जो थंडीत 70-80% महिलांना प्रभावित करतो, तर तो फक्त 20-30% पुरुषांना प्रभावित करतो. बरेच लोक असं मानतात की ही फक्त एक सामान्य गोष्ट आहे, पण त्यामागे एक संपूर्ण विज्ञान आहे.
advertisement
3/7
हे रहस्य उलगडण्यासाठी अभ्यास करण्यात आले आहेत एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की महिलांच्या शरीराचं मुख्य तापमान पुरुषांच्या शरीराच्या तापमानापेत्षा 0.5-1 अंश जास्त असतं, पण त्यांचे हातपाय 2-3 अंश थंड असतात. ब्रिटिश जर्नल ऑफ मेडिसिनमधील संशोधनानुसार, महिला थंडीत 2.5 अंश कमी तापमानात थरथर कापू लागतात, तर पुरुष 1.5 अंशांनी थरथर कापू लागतात.
advertisement
4/7
अभ्यासातून असं दिसून आलं आहे की हे हार्मोन्स, स्नायूंचे वस्तुमान, रक्ताभिसरण आणि चयापचयातील फरक आणि चरबीच्या वितरणामुळे होतं.
advertisement
5/7
महिलांमध्ये मुख्य संप्रेरक इस्ट्रोजेन आहे, जो मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती नियंत्रित करतो. इस्ट्रोजेन शरीरातील हृदय, लिव्हर आणि मेंदू अशा मुख्य अवयवांचं संरक्षण करण्यासाठी रक्तप्रवाहाचं केंद्रीकरण करतं. थंड हवामानात शरीर जगण्याच्या स्थितीत जातं. महत्त्वाच्या अवयवांना उबदार ठेवण्यास प्राधान्य देतं. यामुळे हात, पाय आणि नाक यांसारख्या अवयवांना रक्तपुरवठा कमी होतो, ज्यामुळे ते थंड होतात.
advertisement
6/7
पुरुषांमध्ये, टेस्टोस्टेरॉन हा प्रमुख संप्रेरक आहे, जो स्नायूंच्या वस्तुमानात वाढ करतो. स्नायू उष्णता निर्माण करतात. सरासरी, पुरुषांमध्ये शरीरातील स्नायू 40% असतात, तर महिलांमध्ये हे प्रमाण 30% असतं. यामुळे पुरुषांमध्ये बेसल मेटाबॉलिक रेट (BMR) 5-10% जास्त असतो, म्हणजेच ते जास्त कॅलरीज बर्न करतात आणि जास्त उष्णता निर्माण करतात.
advertisement
7/7
महिलांमध्ये त्वचेखालील चरबी जास्त असते, जी इन्सुलेशन पुरवते पण रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. दुसरीकडे पुरुषांमध्ये कमी चरबी आणि जास्त स्नायू असतात, ज्यामुळे रक्त प्रवाह सुधारतो. मासिक पाळीमुळे महिलांमध्ये लोहाची कमतरता देखील सामान्य आहे, ज्यामुळे ऑक्सिजन वाहून नेणारे हिमोग्लोबिन कमी होतं, ज्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो. या कमी रक्ताभिसरणामुळेच थंड हवामानात महिलांचे हात आणि पाय पुरुषांपेक्षा थंड असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
बायकोचे पाय थंडगार आणि नवऱ्याचे ऊबदार; थंडीत कपलच्या शरीराचं तापमान वेगळं का? संशोधनात समजलं Interesting कारण