TRENDING:

Banana And Milk : केळी आणि दूध एकत्र का खाऊ नये, खाल्लं तर काय होतं?

Last Updated:
Banana And Milk Combination : आयुर्वेदिक डॉक्टर केळी आणि दूध एकत्र खाऊ नका, असा सल्ला देतात. पण का? याचा शरीरावर काय परिणाम होतो?
advertisement
1/6
Banana And Milk : केळी आणि दूध एकत्र का खाऊ नये, खाल्लं तर काय होतं?
बहुतेक जण वजन वाढावं म्हणून केळं आणि दूध एकत्र करून खातात. शिवाय शिकरण हा एक पारंपारिक पदार्थ जो दुधात केळं टाकून बनवला जातो. पण काही डॉक्टर केळी आणि दूध एकत्र खाऊ नये असा सल्ला देतात.
advertisement
2/6
आयुर्वेदानुसार पचनाची प्रक्रिया म्हणजे अग्नी निरोगी आरोग्याची मुख्य गुरुकिल्ली आहे. दूध जड आणि शीत गुणधर्म असलेला पदार्थ तर केळं हलकं आणि वेगाने पचणारं पण कधीकधी थोडं आंबट.
advertisement
3/6
या दोन पदार्थांच्या पचनाचा वेग वेगळा असल्यामुळे एकत्र खाल्ले तर आत पचनावर ताण येतो, पचनक्रिया मंदावते आणि ते पूर्ण पचत नाही आणि त्याचं फर्मेंटेशन होतं म्हणजे ते आंबू लागतात.
advertisement
4/6
आयुर्वेदात याला अम् म्हणजे अपूर्ण पचलेले किंवा टॉक्सिन्स म्हणतात. हे अम् पुढे समस्या वाढवतं. गॅस, ब्लोटिंग, अपचन आणि विषारी प्रभाव निर्माण करू शकते.
advertisement
5/6
दूध आणि केळं दोन्ही कफ वाढवणारे आहेत. एकत्रित घेतल्यास कफ अधिक वाढतो, ज्यामुळे सिनसइन्फ्लेशन, श्वसन समस्या उद्भवतात. अमला आयुर्वेदानुसार शरीरात विष मानलं जातं. पुढे त्वचारोग, त्वचेची अॅळर्जी   त्वचा अ‍ॅलर्ज यासारख्या प्रतिक्रिया होऊ शकतात.
advertisement
6/6
पण हे तुमच्या पचनशक्तीवरही अवलंबून आहे, असंही आयुर्वेदिक डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. केळी आणि दूध एकत्र खाल्ल्याने लगेच त्रास होतो असं नाही. तसंच तुमची पचनशक्ती चांगली असेल तर तुम्हाला काही त्रास होणारही नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Banana And Milk : केळी आणि दूध एकत्र का खाऊ नये, खाल्लं तर काय होतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल