TRENDING:

Hotel Facts : हॉटेलमध्ये जेवणानंतर बडीशेप-खडीसाखर फ्री का देतात? आहे खास कारण

Last Updated:
हॉटेल मोठं असो वा छोटं तिथं एक गोष्ट खूप सामान्य आहे आणि ती म्हणजे जेवणाच्या बिलासह मोफत दिली जाणारी बडीशेप-खडीसाखर. ही काही खास परंपरा आहे का की त्यामागे काही खास कारण आहे? 
advertisement
1/5
Hotel Facts : हॉटेलमध्ये जेवणानंतर बडीशेप-खडीसाखर फ्री का देतात? आहे खास कारण
तुम्ही हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये कधी ना कधी खाल्लं असेलच. तिथं टेबलवर तुम्हाला बडीशेप आणि खडीसाखर ठेवलेली दिसेल, तिथं नसेल तर रिसेप्शन किंवा पेमेंट काऊंटरला तुम्हाला ती ठेवलेली दिसेल. जी आपल्याला फ्री मिळते आणि आपण जेवल्यानंतर सहज खातो. पण ती का ठेवली जाते हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
2/5
हॉटेलमधील मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात जडपणा, गॅस किंवा अपचन जाणवू शकते. अशा परिस्थितीत बडीशेपमध्ये असलेले नैसर्गिक तेल अ‍ॅनेथॉल पाचक रस आणि एन्जाइम्सच्या स्रावाला उत्तेजन देतं. ज्यामुळे अन्नाचं जलद आणि चांगलं पचन होण्यास मदत होते. तर खडीसाखर पोट थंड ठेवते ज्यामुले आम्लपित्तची समस्या होत नाही.
advertisement
3/5
मसालेदार अन्न, विशेषतः लसूण आणि कांदा असलेले अन्न यामुळे तोंडात दुर्गंधी येऊ शकते. पण बडीशेपमधील नैसर्गिक तेल तोंडाची दुर्गंधी दूर करतं, फ्रेश वाटतं. तर खडीसाखर तोंड स्वच्छ करून बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करते. म्हणूनच बडीशेप-खडीसाखरेला नैसर्गिक माउथ फ्रेशनर म्हटले जाते.
advertisement
4/5
बडीशेप आतड्यांचे आरोग्य सुधारतं आणि पोषक तत्वे शोषण्याची क्षमता वाढवतं. खडीसाखर त्याचा प्रभाव संतुलित करते आणि शरीराला ऊर्जा देतं. बडीशेप आणि खडीसाखर खाल्ल्याने गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी होण्यास मदत होते. शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हा एक हलका आणि आरोग्यदायी पर्याय आहे.
advertisement
5/5
भारतीय संस्कृतीत जेवणानंतर पाहुण्यांचं तोंड गोड करण्यासाठी बडीशेप खडीसाखर देणं हा पाहुणचाराचा एक भाग आहे. यामुळे हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा अनुभव ग्राहकांसाठी अत्यंत आनंददायी बनतो, ज्यामुळे ग्राहक समाधानी आणि आनंदी घरी परततात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Hotel Facts : हॉटेलमध्ये जेवणानंतर बडीशेप-खडीसाखर फ्री का देतात? आहे खास कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल