Relationship : विवाहित पुरुषांकडे तरुण मुली का आकर्षीत होतात? तज्ज्ञांनी सांगितली 5 कारणं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो की शेवटी असं का होतं? की तरुण मुली या विवाहित पुरुषांकडेच जास्त आकर्षित होतात? यामागे काही भावनिक, मानसिक आणि सामाजिक कारणं दडलेली असतात. चला जाणून घेऊ या अशा नात्यांमागची ५ मुख्य कारणं. जी तज्ज्ञांनी सांगितली आहेत.
advertisement
1/12

असं म्हणतात लढाईत आणि प्रेमात सगळं माफ आहे. म्हणू तर लोक प्रेमात सगळ्या सीमा ओलांडतात. प्रेमात लोकांना हे भानच रहात नाही की ते एखादी गोष्ट चुकीची करतात का बरोबर. शिवाय प्रेमात वय देखील पाहिलं जात नाही. भावना जागृत झाल्या की त्या कोणालाही, कधीही आणि कुठेही आकर्षित करू शकतात. अनेक वेळा असं दिसून येतं की तरुण मुली विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडतात. हे फक्त सिनेमातच नाही, तर वास्तवातही घडतं.
advertisement
2/12
बॉलिवूडमध्येही याची अनेक उदाहरणं आहेत. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचं प्रेम, संगीता बिजलानी आणि मोहम्मद अझहरुद्दीनचं नातं, किंवा कुनिका सदानंद आणि कुमार सानू यांसारखी प्रसिद्ध अफेअर्स. अशा नात्यांवर समाजात नेहमी चर्चा होते, कधी कौतुक तर कधी टीका.
advertisement
3/12
पण असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो की शेवटी असं का होतं? की तरुण मुली या विवाहित पुरुषांकडेच जास्त आकर्षित होतात? यामागे काही भावनिक, मानसिक आणि सामाजिक कारणं दडलेली असतात. चला जाणून घेऊ या अशा नात्यांमागची ५ मुख्य कारणं. जी तज्ज्ञांनी सांगितली आहेत.
advertisement
4/12
अनुभव आणि परिपक्वतेचं आकर्षणतरुण मुली अजून जीवनातील अनुभव शिकत असतात. विवाहित पुरुष मात्र जास्त स्थिर, परिपक्व आणि अनुभवी असतात. त्यांचं बोलणं, आत्मविश्वास आणि शांत स्वभाव हे मुलींना “मॅच्युअर” आणि “स्मार्ट” वाटतं. त्यामुळे त्या त्यांच्याकडे नैसर्गिकपणे आकर्षित होतात.
advertisement
5/12
सुरक्षिततेची आणि अटेंशनची भावनाअनेक मुली करिअर किंवा जीवनात अजून स्थिर नसतात. विवाहित पुरुष आर्थिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या स्थिर असल्यामुळे ते मुलींना “सेफ” वाटतात. त्यांचं अटेंशन आणि काळजी मिळाल्याने मुलींना आपलेपणाची भावना होते आणि त्यामुळे आकर्षण वाढतं.
advertisement
6/12
ऐकून घेण्याची सवय आणि इमोशनल कनेक्शनविवाहित पुरुष बहुतेक वेळा इतरांचं बोलणं शांतपणे ऐकतात आणि त्यांच्या भावना समजून घेतात. ही इमोशनल समजूत मुलींना खूप आवडते. रोमँससोबत जर अटेंशन आणि रिस्पेक्ट मिळालं तर ते नातं अधिक मजबूत वाटतं.
advertisement
7/12
सोशल मीडियाचा प्रभावआजच्या काळात सोशल मीडियावर “कॉन्फिडेंट, सक्सेसफुल” पुरुषांचे फोटो आणि पोस्ट्स सहज पाहायला मिळतात. अशा इमेजमुळे मुलींना वाटतं की हे पुरुष अधिक आकर्षक आणि स्मार्ट आहेत. काही वेळा फक्त “थोडं एक्सप्लोर करूया” या विचारातूनही त्या अशा नात्यांकडे वळतात.
advertisement
8/12
रोमांच आणि नवीन अनुभवाची ओढकाही मुलींसाठी विवाहित पुरुषासोबत रिलेशनशिप म्हणजे एक थ्रिल असतो. काहीतरी वेगळं, गुपित आणि रोमांचक. हीच नवीनतेची ओढ कधी कधी त्यांना सावधानतेचे सिग्नल दुर्लक्षित करायला लावते.
advertisement
9/12
तज्ज्ञ काय सांगतात?सायकोलॉजिस्ट्स म्हणतात, अशा नात्यांकडे आकर्षण हे अनेकदा भावनिक अस्थिरतेचं परिणाम असू शकतं. तरुण वयात निर्णय घेण्यापूर्वी आपल्या भावना आणि प्राधान्य समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
advertisement
10/12
कोणत्याही नात्यात जाण्यापूर्वी त्या व्यक्तीचं पार्श्वभूमी आणि कुटुंब समजून घ्या. आपल्या आत्मसन्मान आणि मानसिक आरोग्याला नेहमी प्राधान्य द्या. निर्णय घेण्याआधी विश्वासू मित्र किंवा एक्सपर्टचा सल्ला घ्या. सोशल मीडिया किंवा भावनांच्या भरात घाईघाईत निर्णय घेऊ नका.
advertisement
11/12
शेवटी, विवाहित पुरुषांबद्दल आकर्षण वाटणं हे चुकीचं नाही, पण त्या नात्यात उतरण्यापूर्वी स्वतःच्या भावनांचा, आत्मसन्मानाचा आणि भविष्यातील परिणामांचा विचार करणं अत्यावश्यक आहे. प्रेमात समजूत आणि स्वाभिमान दोन्हीही तितकेच महत्त्वाचे असतात.
advertisement
12/12
( नोट : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही आमचा उद्देश फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Relationship : विवाहित पुरुषांकडे तरुण मुली का आकर्षीत होतात? तज्ज्ञांनी सांगितली 5 कारणं