Worlds Shortest Flight : फक्त 53 सेकंदात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचा, जगातील सगळ्यात छोटा विमान प्रवास
- Published by:Priya Lad
Last Updated:
जिथं आपल्याला बस आणि ट्रेनने पोहोचायला कित्येक तास लागतात तिथं विमान आपल्याला काही तासात पोहोचवतं. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमान प्रवास उत्तम. पण सगळ्यात कमीत कमी विमान प्रवास किती वेळाचा असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे.
advertisement
1/6

जगातील सर्वात लहान विमान प्रवास किती वेळाचा असेल, काही तास, काही मिनिटं, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात! खरं तर जगात असाही एक विमान प्रवास आहे जो फक्त काही सेकंदाचा आहे. विमानाने टेक ऑफ केल्यानंतर काही सेकंदातच ते लँड होतं.
advertisement
2/6
हे सामान्य उड्डाण नाही तर जगातील सर्वात लहान व्यावसायिक उड्डाण म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद आहे. या प्रवासाचं अंतर फक्त 2.7 किलोमीटर आहे आणि विमानाला ते पूर्ण करण्यासाठी सरासरी 80 सेकंद लागतात. कधीकधी वाऱ्याची दिशा अनुकूल असल्यास हा वेळ 53 सेकंदांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. ज्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.
advertisement
3/6

4/6
तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या कमी अंतरासाठी विमानाचा वापर का केला जातो? खरंतर हा विमान प्रवास आहे तो दोन बेटांमध्ये. जिथं रस्ता किंवा पूल नाही आणि समुद्रही असा आहे की बोटीने प्रवास करणं कठीण होऊ शकते. म्हणूनच ही हवाई सेवा स्थानिक लोकांसाठी आणि अत्यावश्यक सेवांसाठी लाइफलाइन आहे.
advertisement
5/6
प्रतिकात्मक फोटोया प्रवासासाठी एक लहान ब्रिटन-नॉर्मन BN2B-26 आयलंडर विमान वापरलं जातं. ज्यामध्ये सुमारे 8-10 प्रवासी बसू शकतात. प्रवासी त्यात बसून पायलटला विमान उडवताना पाहू शकतात, ज्यामुळे हा अनुभव आणखी खास बनतो.
advertisement
6/6
हे अनोखे विमान केवळ स्थानिकांनाच सुविधा देत नाही तर जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते जे या आश्चर्यकारक आणि सर्वात लहान हवाई प्रवासाचा अनुभव घेऊ इच्छितात. आता हे ठिकाण आहे कुठे तर स्कॉटलंडच्या ऑर्कने बेटांवर असलेल्या वेस्ट्रे आणि पापा वेस्ट्रे बेटांदरम्यान हे उड्डाण आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Worlds Shortest Flight : फक्त 53 सेकंदात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचा, जगातील सगळ्यात छोटा विमान प्रवास