कोरोनात वडील गेले, लोकांसाठी झटला अन् 25 वर्षांचा यश पिंपरीत नगरसेवक झाला!
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
जनरेशन झेडमधील तरुण उमेदवारांनी थेट मैदानात उतरत नगरसेवकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. पारंपरिक राजकारणापेक्षा वेगळी दृष्टी, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नागरिकांशी थेट संवाद साधण्याची शैली यामुळे हे तरुण नेतृत्व विशेष लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
1/5

पुणे पालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी संपताच पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये जनरेशन झेडमधील तरुण उमेदवारांनी थेट मैदानात उतरत नगरसेवकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. पारंपरिक राजकारणापेक्षा वेगळी दृष्टी, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नागरिकांशी थेट संवाद साधण्याची शैली यामुळे हे तरुण नेतृत्व विशेष लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
2/5
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या चिखली प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी गटातून विजयी झालेले 25 वर्षीय यश साने यांची कहाणी ही केवळ निवडणूक विजयाची नसून संघर्षातून उभारी घेण्याची प्रेरणादायी गोष्ट आहे. यश यांचे वडील माजी विरोधी पक्षनेते होते आणि त्यांनी सलग तीन टर्म नगरसेवक म्हणून काम केले. मात्र कोरोना काळात त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
advertisement
3/5
या कठीण काळात यश यांना बारावीनंतर शिक्षण थांबवावे लागले. मात्र वडिलांनी समाजासाठी जे कार्य केले, तो वारसा पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी केला. माझे वडील नगरसेवक होते. त्यांनी लोकांसाठी केलेले काम आणि जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास आजही मला प्रेरणा देतो. त्यांचीच सेवा पुढे नेण्याचा मी प्रयत्न करतोय, असे यश साने सांगतो.
advertisement
4/5
वडिलांच्या कार्यामुळे मिळालेली जनतेची सहानुभूती आणि विश्वास याच बळावर यश साने यांना राष्ट्रवादी गटातून उमेदवारी मिळाली आणि त्यांनी ती विश्वासार्हपणे विजयात रूपांतरित केली. तरुण वयात नगरसेवकपदाची जबाबदारी स्वीकारताना विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडला आहे.
advertisement
5/5
आकुर्डी-चिखली रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्या सोडवणे, स्वच्छतेवर भर देणे, सुसज्ज भाजीपाला बाजार उभारणे, सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे, महिला पोलिस ठाण्याची मागणी आणि सरकारी योजनांचा लाभ थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे यश साने यांच्या प्राधान्यक्रमात आहे. जनरेशन झेडच्या या तरुण नगरसेवकांच्या प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक राजकारणाला नवे विचार, नवी ऊर्जा आणि नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Local Body Elections/
कोरोनात वडील गेले, लोकांसाठी झटला अन् 25 वर्षांचा यश पिंपरीत नगरसेवक झाला!