TRENDING:

82 वर्षांच्या 'तरुण' आजोबांची 'सेकंड इनिंग', नांदेडच्या निवृत्त शिक्षकाला मिळाली नवरी, जोडी हजला रवाना!

Last Updated:
नांदेड जिल्ह्याातील धर्माबाद इथं राहणारे एका ८२ वर्षीय 'तरुण' आजोबांचा निकाह पार पडलाा आहे. ३ मुले, ३ सुना, ३ मुली, ३ जावई आणि तब्बल २२ नातवंडं असा मोठा गोतावळा असलेल्या या सेवानिवृत्त शिक्षकाने ५० वर्षीय महिलेसोबत निकाह केला.
advertisement
1/8
82 वर्षांच्या आजोबांची 'सेकंड इनिंग', नांदेडच्या निवृत्त शिक्षकाला मिळाली नवरी!
वय हा फक्त एक एक आकडा आहे, असं नेहमी म्हटलं जातं. उतार वयात माणसं देवधर्म आणि नातवंडांना सांभाळण्याची जबाबदारी सांभाळत असतात. पण,  नांदेड मध्ये एका ८२ वर्षीय तरुण आजोबांनी लग्नबेडीत अडकून दाखवलं आहे. घरात  ३ मुलं, ३ सुना, ३ मुली, ३ जावई आणि तब्बल २२ नातवंडं असा मोठा गोतावळा असलेल्या या सेवानिवृत्त शिक्षकाने वयाच्या 82 व्या वर्षी निकाह केला आहे. या आजोबांची पाटर्नर ही एक ५० वर्षीय महिला आहे. आता हे आजोबा आपल्या पत्नीसोबत हजसाठी साऊदी अरेबियाला गेले आहे. 
advertisement
2/8
नांदेड जिल्हयातील धर्माबाद इथं राहणारे 82 वर्षीय चौधरी शेख हुसेन शेख अहमद असं लग्न करणाऱ्या नवरदेवाचं नाव आहे. मूळचे माहूरचे रहिवासी असलेले हुसेन शेख हे नोकरीनिमित्त धर्माबादला स्थायिक झाले. इथं उर्दू प्रायमरी स्कूलमध्ये ३५ वर्षे ज्ञानदानाचं काम केलं. त्यानंतर २२ वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते.
advertisement
3/8
त्यांचा पहिला विवाह खादरबी यांच्याशी झाला होता. प्रपंचाचा गाडा ओढताना त्यांना सहा मुलं-मुली आणि डझनभर नातवंडं झाली. मात्र, दीड वर्षापूर्वी पत्नी खादरबी यांचं निधन झालं आणि हुसेन शेख हे एकाकी पडले.
advertisement
4/8
भरल्या घरात मुलं, सुना आणि नातवंडं असली, तरी जोडीदाराच्या निधनानं आलेली पोकळी त्यांना अस्वस्थ करत होती. मनातील हा एकटेपणा दूर करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा संसार थाटण्याचा धाडसी निर्णय घेतला.
advertisement
5/8
विशेष म्हणजे, त्यांनी स्वतःच आपल्यासाठी जोडीदाराचा शोध सुरू केला. तेलंगणातील भैंसा येथील ५० वर्षीय अमिना बेगम यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि दोन्ही कुटुंबांच्या संमतीनं ३० जानेवारी २०२६ रोजी मुस्लिम परंपरेनुसार हा निकाह पार पडला.
advertisement
6/8
शेख यांच्या लग्नासोहळ्याबद्दल  समाजात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी याकडे आश्चर्यानं पाहिलं, तर काहींनी नकारात्मक टीकाही केली
advertisement
7/8
मात्र, गावातील ज्येष्ठ नागरिक आणि सुज्ञ मंडळींनी या निर्णयाचे स्वागत केलं आहे. "वय हा केवळ एक आकडा आहे, म्हातारपणात माणसाला शरीरसाथीपेक्षाही मनसोबतीची जास्त गरज असतं," अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. 
advertisement
8/8
हुसेन शेख हे 16 फेब्रुवारी रोजी ते हज यात्रेसासाठी पत्नी सोबत सऊदी अरेबियाला गेले आहेत. ते हज यात्रेसाठी जातांना त्यांचा सत्कार करतानाचे फोटो व्हायरल झाले आणि समाज माध्यमावर त्याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
82 वर्षांच्या 'तरुण' आजोबांची 'सेकंड इनिंग', नांदेडच्या निवृत्त शिक्षकाला मिळाली नवरी, जोडी हजला रवाना!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल