TRENDING:

IND vs NED : ज्या मैदानात रोहित विराटने वर्ल्ड कप गमावला, तिथेच टीम इंडिया उघडी पडली, सूपर 8 आधी सूर्याची झोप उडाली

Last Updated:
टीम इंडियाने नेदरलँड समोर 194 धावांचे धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड फक्त 176 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे टीम इंडियाने नेदरलँडचा 17 धावांनी पराभव केला आहे.
advertisement
1/8
ज्या मैदानात रोहित विराटने वर्ल्ड कप गमावला, तिथेच टीम इंडिया उघडी पडली, सूपर 8
ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँडचा 17 धावांनी पराभव केला आहे.
advertisement
2/8
टीम इंडियाने नेदरलँड समोर 194 धावांचे धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड फक्त 176 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे टीम इंडियाने नेदरलँडचा 17 धावांनी पराभव केला आहे.
advertisement
3/8
दरम्यान जरी टीम इंडियाने हा सामना जिंकला असला तरी गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादवच टेन्शन मात्र वाढलं आहे. कारण सूपर 8 आधी टीम इंडियाच्या काही चूका त्यांना महागात पडू शकतात.
advertisement
4/8
टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅचविनर अभिषेक शर्मा हा आऊट ऑफ फॉर्म आहे. त्याने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. पण त्याला एक धाव काढता आली नाही. ग्रुप स्टेजमध्ये भारताचे सामने हे दुबळ्या संघाशी होती त्यामुळे ते चालून गेले. पण सूपर 8 मध्ये टीम इंडियासमोर बलाढ्य संघाशी सामने आहेत. त्यामुळे अभिषेकची बॅट चालणे गरजेचे आहे, नाहीतर टीम इंडियासाठी ही धोक्याची घंटा आहे.
advertisement
5/8
नेदरलँड विरूद्ध सामन्यात टीम इंडियाने पॉवरप्लेमध्ये 51 धावा देऊन 2 विकेट गमावल्या होत्या. खरं तर इतक्या दुबळ्या संघाविरूद्ध टीम इंडियाने पॉवरप्लेमध्ये आणखी 20 ते 30 धावा करणे अपेक्षित होते. पण टीम इंडिया अपयशी ठरली होती.त्यामुळे जर दुबळ्या संघाविरूद्ध जर टीम इंडियाचे बॅटर बॅटींग करत नसतील बलाढ्य संघाविरूद्ध काय करणार? हा मोठा प्रश्न आहे.
advertisement
6/8
पॉवर प्लेनंतर टीम इंडिया मिडल ओव्हरमध्येही धावा करण्यात अपयशी ठरली. भारताने 7 व्या ओव्हरमध्ये 5 रन, 8 व्या ओव्हरमध्ये 4 रन, 9व्या ओव्हरमध्ये 9 रन आणि 10 व्या ओव्हरमध्ये 5 रन काढले. पुन्हा 11 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला फक्त 2 रनच काढता आले. म्हणजेच साधारण 5 ओव्हरमध्ये भारताने फक्त 25 धावा काढल्या होत्या.पाकिस्तान विरूद्ध भारताकडून हीच चूक घडली होती.
advertisement
7/8
नेदरलँडच्या बॅटींग लाईन दरम्यानही टीम इंडियाच्या गोलंदाजांना विकेट काढण्यात यश आले नव्हते. नेदरलँडने पॉवरप्लेमध्ये फक्त 36 धावा ठोकल्या होत्या,त्यामुळे टीम इंडियाला धावा रोखण्यात यश आले पण त्यांना नेदरलँड सूरूवातीला धक्का देता आले नाही.
advertisement
8/8
टीम इंडियाचा स्टार खेळाडू तिलक वर्माची खराब फिल्डींग हे देखील मुख्य कारण आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये दोन कॅच सूटल्या.एक सूर्या आणि रिंकूमध्ये धडक झाल्यामुळे कॅच सूटली तर दुसरी तिलव वर्माने कॅच सूटली.तर याआधीच्या सामन्यात देखील त्याने दोन कॅच सोडल्या होत्या. या चूका टीम इंडियाने वेळीच सुधारायला हव्यात नाहीतर वर्ल्ड कप हातातून निसटेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NED : ज्या मैदानात रोहित विराटने वर्ल्ड कप गमावला, तिथेच टीम इंडिया उघडी पडली, सूपर 8 आधी सूर्याची झोप उडाली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल