'ब्रा जाळणे, दारू पिणे...', महिलांबद्दल सलमान खानच्या हिरोईनचं शॉकिंग स्टेटमेंट, नेमकं म्हणाली तरी काय?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
काहींनी तिच्या या धाडसी विचारांचे स्वागत केले आहे, तर काहींनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. नक्की काय म्हणाली ही अभिनेत्री? जाणून घेऊया.
advertisement
1/8

'मैने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्री आजही अनेकांच्या हृदयाची धडकन आहे. पडद्यावरची ती लाजाळू 'सुमन' खऱ्या आयुष्यात मात्र अत्यंत परखड विचारांची आहे.
advertisement
2/8
अलीकडेच भाग्यश्रीने महिलांच्या स्वातंत्र्य, आधुनिक विचारसरणी आणि 'फेमिनिझम' यावर केलेल्या एका विधानाने सोशल मीडियावर वाद निर्माण केला.
advertisement
3/8
काहींनी तिच्या या धाडसी विचारांचे स्वागत केले आहे, तर काहींनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. नक्की काय म्हणालीय भाग्यश्री? जाणून घेऊया.
advertisement
4/8
'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत भाग्यश्रीने आजच्या पिढीच्या स्त्रीवादाच्या व्याख्येवर थेट बोट ठेवलं. ती म्हणाली, "आजकाल अनेक महिलांना वाटतं की ब्रा जाळणं, तोकडे कपडे घालणं, दारू पिणं किंवा पुरुषांप्रमाणे शिव्या देणं म्हणजे स्त्रीवाद आहे. पण माझ्या मते, हे फेमिनिझम नाही. केवळ पुरुषांची बरोबरी करण्यासाठी त्यांच्या वाईट सवयींचे अनुकरण करणे म्हणजे प्रगती नव्हे."
advertisement
5/8
भाग्यश्रीने पुढे स्पष्ट केलं की, पितृसत्ताक पद्धतीचा विरोध करण्याच्या नादात महिला स्वतःचं अस्तित्व हरवत चालल्या आहेत. "तुम्ही शिव्या दिल्या किंवा तोकडे कपडे घातले म्हणून तुम्ही पुरुषांच्या बरोबरीचे होत नाही. स्त्रीवाद म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने प्रगतीची संधी मिळवणं, केवळ त्यांच्यासारख्या सवयी लावून घेणं नव्हे," अशा स्पष्ट शब्दांत तिने आपलं मत मांडलं.
advertisement
6/8
भाग्यश्रीच्या मते, निसर्गाने स्त्री आणि पुरुषांना वेगळ्या गुणांनी नटवले आहे. ती म्हणते, "स्त्रीकडे काळजी घेण्याची वृत्ती, संवेदनशीलता आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताकद नैसर्गिक आहे. स्त्री पुरुषापेक्षा जास्त सहनशील असते. या गुणांचा अभिमान बाळगून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जावं, त्यांच्याशी केवळ स्पर्धा करण्यासाठी स्वतःचे मूळ गुण सोडू नयेत."
advertisement
7/8
भाग्यश्रीने जेव्हा सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं, तेव्हा एकदा एका विमान प्रवासात शाहरुख आणि भाग्यश्री यांची भेट झाली होती. शाहरुख तेव्हा स्ट्रगल करत होता. त्याने भाग्यश्रीची विनम्रता आणि तिचे विचार पाहून तिचं कौतुक केलं होतं.
advertisement
8/8
इतकंच नाही, तर भाग्यश्रीच्या साधेपणामुळे शाहरुख इतका प्रभावित झाला होता की, आजही तो अनेक मुलाखतींमध्ये भाग्यश्रीचा उल्लेख एक 'आदर्श आणि सुसंस्कृत सहकलाकार' म्हणून करतो. भाग्यश्रीने जे विचार मांडले आहेत, तेच मूल्य जोपासल्यामुळे आजही शाहरुख तिला इंडस्ट्रीतील सर्वात डाऊन टू अर्थ अभिनेत्री मानतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'ब्रा जाळणे, दारू पिणे...', महिलांबद्दल सलमान खानच्या हिरोईनचं शॉकिंग स्टेटमेंट, नेमकं म्हणाली तरी काय?