Ahmednagar News : महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती; ऐनवेळी दाखल करुन घेण्यास नकार, अहमदनगर जिल्ह्यातील घटना
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Ahmednagar News : राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील ग्रामीण रुग्णालयाचा हलगर्जीपणाचा फटका एका कुटुंबाला बसला आहे. (हरीष दिमोटे, प्रतिनिधी)
advertisement
1/5

राज्यातील आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजले असल्याची प्रचिती पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात आली आहे.
advertisement
2/5
राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णवाहिकेत महिलेची प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना घडली.
advertisement
3/5
वाल्मिक जोगदंड शनिवारी मध्यरात्री आपल्या पत्नीला बाळंतपणासाठी पुणतांबा ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले असता तिथे रात्रपाळीला उपस्थित असलेले कर्मचारी यांनी दाखल करण्यास नकार दिला. डॉक्टरही वेळेवर हजर नव्हते. ब्रदरने गर्भवतीची परीस्थिती नाजूक असून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
advertisement
4/5
ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात रुग्णवाहिका उभी होती. पण ती कामाला आली नाही. शेवटी महिलेच्या पती वाल्मिक जोगदंड यांनी 108 नंबरवर फोन करून रूग्णवाहीका बोलावली. एक तासानंतर महिलेला राहाता शहराकडे हलवले. रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच महिलेची रूग्णवाहिकेत प्रसुती झाली. गाडी न थांबवता थेट रूग्णालयात गाडी नेली. सुदैवाने बाळ बाळंतीन सुखरूप. ही घटना शनिवारी घडली.
advertisement
5/5
संतप्त नातेवाईक आज पुणतांबा रूग्णालयात पोहचले. त्यांनी डॉक्टरांना चांगलेच फैलावर घेतले. महिला डॉक्टरांनी दिली उडवाउडवीची उत्तरे. जर बाळ आणि बाळांतीणच्या जिवास धोका झाला असता तर जबाबदार कोण? संबंधित दोषीवर कारवाई करण्याची मागणी, कुटुंबियांनी केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
Ahmednagar News : महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती; ऐनवेळी दाखल करुन घेण्यास नकार, अहमदनगर जिल्ह्यातील घटना