TRENDING:

आई गं पोटात खूप दुखतंय! मासिक पाळीच्या असह्य वेदना, 19 वर्षीय मुलीचा मृत्यू

Last Updated:
Girl Died After Menstrual Pain : बहुतेक जण मासिक पाळीच्या वेदनांना किरकोळ त्रास, सामान्य समजून दुर्लक्ष करतात. आज त्या वेदनेने एका तरुणीचा जीव घेतला.
advertisement
1/7
आई गं पोटात खूप दुखतंय! मासिक पाळीच्या असह्य वेदना, 19 वर्षीय मुलीचा मृत्यू
मासिक पाळीच्या कालावधीत महिलांना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यापैकी एक म्हणजे पोटातील वेदना. या वेदना असह्य असतात. पण एका मुलीच्या बाबतीत त्या इतक्या भयंकर ठरल्या की तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या आहेत.
advertisement
2/7
कर्नाटकातील तुमाकुरु जिल्ह्यातील बायथा गावातील ही धक्कादायक घटना आहे. 19 वर्षांच्या मुलीने मासिक पाळीच्या वेदनांमुळे आपला जीव गमावला.
advertisement
3/7
कलबुर्गीतील सलाहल्ली इथं राहणारी ही तरुणी नोकरीच्या शोधात दोन महिने बायथाला तिच्या मामाच्या घरी आली होती. नोकरी न मिळाल्याने ती तिच्या मामाच्या घरीच राहिली.
advertisement
4/7
ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला त्या दिवशी घरी कोणीही नव्हतं. ती एकटीच होती. घरातील लोक जेव्हा घरी परतले तेव्हा ती त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.
advertisement
5/7
मीडिया रिपोर्ट्सनुसार मुलीला बऱ्याच काळापासून पोटदुखी आणि मासिक पाळीच्या वेदना होत होत्या. वेदना इतक्या तीव्र होत्या की ती दैनंदिन कामंही करू शकत नव्हती.
advertisement
6/7
तिला मासिक पाळीच्या वेदना असह्य झाल्या म्हणून तिने स्वत:च आपलं आयुष्य संपवलं, असं तिच्या कुटुंबाने सांगितल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.
advertisement
7/7
माहितीनुसार, पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलीस प्रत्येक दृष्टिकोनातून तपास करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
आई गं पोटात खूप दुखतंय! मासिक पाळीच्या असह्य वेदना, 19 वर्षीय मुलीचा मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल