Mauni Amavasya: दर्श मौनी अमावस्येचा दिवस खूप महत्त्वाचा; गुप्तपणे करायचं 'हे' एक काम, घराची वर्षभर भरभराट
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mauni Amavasya: मराठी पंचागानुसार अमावस्या आली की महिना बदलतो, सध्या मराठी पौष महिना सुरू असून रविवारी अमावस्येनंतर माघ महिना सुरू होईल. या महिन्याची अमावस्या ही दर्श मौनी अमावस्या आहे. मौनी अमावस्येचा दिवस पितृकृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.
advertisement
1/5

दर्श मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि विष्णू यांची पूजा केल्याने शुभ फळ मिळते. या दिवशी आपण काही गोष्टींचे गुप्तपणे दान केले, तर आयुष्यात शुभता येते आणि पूर्वज-पित्रांसोबतच देवी-देवतांचा आशीर्वादही प्राप्त होतो.
advertisement
2/5
मौनी अमावस्येचे गुप्त दान - मौनी अमावस्येच्या दिवशी गुप्त दान करणे खूप फलदायी मानले जाते. दान अशा प्रकारे करावे की, ज्याला दान दिले आहे त्याला तुमच्याबद्दल माहिती नसावी आणि तुमच्या घरातील लोकांनाही या दानाबद्दल कळू नये. असे गुप्त दान केल्याने जीवनात समृद्धी येते आणि अनेक दोषांपासून मुक्ती मिळते.
advertisement
3/5
मंगळ आणि सूर्य ग्रहाचा शुभ प्रभाव मिळवण्यासाठी आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी गुळ, गहू आणि लाल वस्त्राचे गुप्त दान करावे. यामुळे कुंडलीतील सूर्य आणि मंगळाची स्थिती सुधारते आणि पित्रांचा आशीर्वादही मिळतो.
advertisement
4/5
पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी काळ्या तिळाचे दान करावे. तुम्ही गुप्तपणे एखाद्या मंदिरातही काळे तीळ देऊ शकता. तसेच काळे तीळ मिश्रित जलाने शिवलिंगाचा जलाभिषेक केल्यास मनोकामना पूर्ण होतात.
advertisement
5/5
धनाचे दान करणे देखील या दिवशी खूप शुभ असते. गुप्तपणे धनदान केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक भरभराट होते. यासोबतच अन्न, वस्त्र, पादत्राणे, पलंग किंवा सतरंजी यांचेही गुप्त दान तुम्ही करू शकता. यामुळे शनी, सूर्य, गुरु, मंगळ आणि चंद्र हे सर्व ग्रह शांत होतात आणि जीवनातील संकटे दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Mauni Amavasya: दर्श मौनी अमावस्येचा दिवस खूप महत्त्वाचा; गुप्तपणे करायचं 'हे' एक काम, घराची वर्षभर भरभराट