TRENDING:

Surya Budh Yuti 2026: शनिवारी अमावस्या लागण्याआधी 10:27 AM पासून नशीब चमकणार; भाग्याची साथ 3 राशींना

Last Updated:
Surya Budh Yuti 2026 Horoscope: जानेवारी महिना सुरू झाल्यापासून ग्रह-नक्षत्रांची स्थिती विशेष मानली जात आहे. त्यातच आता दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी सूर्य आणि बुध या दोन ग्रहांची मकर राशीत युती होणार आहे. बुध सकाळी 10:27 वाजता मकर राशीत प्रवेश करेल आणि 3 फेब्रुवारीपर्यंत या राशीत राहील. सूर्य आधीच 14 जानेवारीपासून मकर राशीत विराजमान आहे.
advertisement
1/6
शनिवारी अमावस्या लागण्याआधी 10:27 AM पासून नशीब चमकणार; भाग्याची साथ 3 राशींना
सूर्य आणि बुधाच्या या एकत्र येण्यामुळे बुधादित्य राजयोग तयार होत आहे, हा ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ योग मानला जातो. दिनांक 3 फेब्रुवारीपर्यंत राहणाऱ्या या योगाचा विशेष फायदा 3 राशींच्या लोकांना होणार असून मोठे लाभ मिळू शकतात.
advertisement
2/6
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा बुधादित्य राजयोग नशिबाची साथ देणारा ठरेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील, पद-प्रतिष्ठेत वाढ होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी संबंध सुधारल्यामुळे त्याचा फायदा प्रगतीसाठी होईल. बुधाच्या प्रभावामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.
advertisement
3/6
वृषभेच्या व्यावसायिकांना नफा कमवण्याच्या चांगल्या संधी मिळतील आणि नवीन करार पूर्ण होऊ शकतात. हे दिवस तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अनुकूल आहेत.
advertisement
4/6
तूळ राशीच्या व्यक्तींना सुद्धा सूर्य-बुध युतीचा मोठा लाभ मिळेल. 17 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या काळात तुम्ही नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. सूर्य देवाच्या कृपेने तुमच्या सुख-सोयींमध्ये आणि संपत्तीत वाढ होईल. अचानक धनलाभाचे योग असून अडकलेले पैसे परत मिळू शकतात.
advertisement
5/6
तूळ राशीचे जे लोक बेरोजगार आहेत किंवा नोकरी बदलू इच्छितात, त्यांच्यासाठी ही वेळ उत्तम आहे. या काळात लक्ष्मीची कृपा असल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, वडिलांकडून किंवा सासरच्या बाजूने धनलाभ होऊ शकतो.
advertisement
6/6
मीन राशीच्या लोकांसाठी हा राजयोग कौटुंबिक सुख देणारा असेल. गुंतवणुकीसाठी हा काळ अतिशय चांगला असून भविष्यात त्यातून मोठा फायदा होऊ शकतो. सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल आणि पैशांची अडचण भासणार नाही. तुमचे आरोग्य चांगले राहील, फक्त खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. करिअरच्या दृष्टीने नवीन संधी चालून येतील, जे अविवाहित आहेत त्यांना या काळात जोडीदार मिळण्याची दाट शक्यता आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Surya Budh Yuti 2026: शनिवारी अमावस्या लागण्याआधी 10:27 AM पासून नशीब चमकणार; भाग्याची साथ 3 राशींना
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल