उलटी गिनती सुरू! 2026 मध्ये बुध बिघडवणार गेम, 3 राशींच्या लोकांचं वाढणार टेन्शन; असं काय घडणार?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, बुद्धी, संवाद आणि व्यापाराचा कारक असलेला 'बुध' ग्रह जेव्हा वक्री होतो, तेव्हा त्याचे परिणाम अत्यंत तीव्र असतात. वक्री चाल म्हणजे ग्रहाचे उलट्या दिशेने फिरणे असे भासणे.
advertisement
1/7

ज्योतिषशास्त्रानुसार, बुद्धी, संवाद आणि व्यापाराचा कारक असलेला 'बुध' ग्रह जेव्हा वक्री होतो, तेव्हा त्याचे परिणाम अत्यंत तीव्र असतात. वक्री चाल म्हणजे ग्रहाचे उलट्या दिशेने फिरणे असे भासणे.
advertisement
2/7
2026 या वर्षात बुध ग्रह तब्बल तीन वेळा आपली चाल बदलणार आहे. या बदलामुळे विशेषतः तूळ, कन्या आणि वृश्चिक या तीन राशींच्या जातकांना मनस्ताप आणि आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
3/7
पहिली वक्री चाल: 26 फेब्रुवारी ते 21 मार्च 2026 (कुंभ आणि मीन राशीत). 2. दुसरी वक्री चाल: 29 जून ते 24 जुलै 2026 (कर्क आणि मिथुन राशीत). 3. तिसरी वक्री चाल: 24 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2026 (तूळ आणि वृश्चिक राशीत).
advertisement
4/7
तूळ - नात्यात दुरावा: ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील बुधाची वक्री चाल तूळ राशीतच होणार आहे. यामुळे तुमच्या संवादकौशल्यावर परिणाम होईल. जोडीदाराशी किंवा व्यवसायातील भागीदाराशी बोलताना गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे. या काळात कोणतेही महत्त्वाचे कायदेशीर करार किंवा मोठे निर्णय घेणे टाळावे.
advertisement
5/7
कन्या - कामात अडथळे: बुध हा कन्या राशीचा स्वामी आहे, त्यामुळे बुधाची वक्री चाल या जातकांना जास्त प्रभावित करते. नोकरीच्या ठिकाणी तांत्रिक बिघाड, ईमेल्स किंवा महत्त्वाचे मेसेजेस वेळेवर न पोहोचणे यामुळे तुमचे काम रखडू शकते. कामाचा ताण वाढल्याने आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.
advertisement
6/7
वृश्चिक - आर्थिक जोखीम: तिसरी वक्री चाल वृश्चिक राशीवरही परिणाम करेल. या काळात पैशांच्या देवाणघेवाणीत सावध राहा. गुंतवणुकीत फसवणूक होण्याची शक्यता आहे. जुनी गुपिते उघड झाल्यामुळे किंवा वादांमुळे तुमचे मानसिक आरोग्य बिघडू शकते.
advertisement
7/7
या तिन्ही राशींच्या लोकांसाठी बुधाची उलटी चाल संवादाचे माध्यम कठीण करेल. तुम्ही एक बोलाल आणि समोरच्याला दुसराच अर्थ समजेल. त्यामुळे कोणत्याही वादात पडण्यापेक्षा मौन पाळणे उत्तम ठरेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
उलटी गिनती सुरू! 2026 मध्ये बुध बिघडवणार गेम, 3 राशींच्या लोकांचं वाढणार टेन्शन; असं काय घडणार?