TRENDING:

कुठे थंडीचा जोर तर कुठे ढगाळ वातावरण, विदर्भातील आजचं हवामान अपडेट पाहीलं का?

Last Updated:
विदर्भातील किमान तापमानात 2 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे विदर्भातील किमान तापमानात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. 
advertisement
1/5
कुठे थंडीचा जोर तर कुठे ढगाळ वातावरण, विदर्भातील आजचं हवामान अपडेट पाहीलं का?
फेंगल चक्रीवादळाच्या संकटानंतर राज्यात थंडीचा जोर वाढण्यास झाली आहे . दोन दिवस आधी राज्यातील विविध ठिकाणी किमान तापमान हे 8 ते 9 अंशवर आले होते. आता मात्र त्यात वाढ झालेली दिसून येत आहे. राज्यातील किमान तापमानात वाढ होऊन आता सर्वात कमी तापमान हे 12 अंश सेल्सिअस इतके असल्याचे दिसून येत आहे. विदर्भातील किमान तापमानात देखील 2 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे.
advertisement
2/5
विदर्भात 14 डिसेंबरला हवामान कोरडे असणार आहे. नागपूरमध्ये 14 डिसेंबर रोज शनिवारला अंशतः ढगाळ आकाश राहून किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. दोन दिवस आधी विदर्भात सर्वच जिल्ह्यांतील किमान तापमानात घट झाल्याची बघायला मिळत होती. आता मात्र त्यात 2 ते 3 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे.
advertisement
3/5
अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा या सर्व जिल्ह्यातील किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. त्याचबरोबर तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण देखील असणार आहे. भंडारा जिल्ह्यातील किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असणार आहे तर अमरावती या जिल्ह्यातील किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असणार आहे.
advertisement
4/5
गडचिरोली मधील किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. वाशिममधील किमान तापमान 12 अंश सेल्सिअस तर यवतमाळ जिल्ह्यातील किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांत 13 डिसेंबरच्या तुलनेत 2 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे विदर्भात थंडीची तीव्रता थोडी कमी होण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
मात्र सकाळच्या वेळी थंडीचा जोर कायम असणार आहे. वातावरणात पुन्हा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाच्या अंदाजवरून दिसत आहे. अमरावती जिल्ह्यातील काही भागांत तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे शेतकरी आधीच चिंतेत आहेत. आता ढगाळ वातावरण आणि थंडीचा जोर यामुळे तूर पिकाचे आणखी नुकसान होईल का? अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अकोला/
कुठे थंडीचा जोर तर कुठे ढगाळ वातावरण, विदर्भातील आजचं हवामान अपडेट पाहीलं का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल