Wether Alrt : विदर्भासाठी 24 तास महत्त्वाचे, उष्णतेच्या लाटेत 6 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
आज 1 मे रोजी विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम असून, काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
1/7

आज 1 मे रोजी विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम असून, काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
2/7
नागपूरमध्ये कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस इतके असून येथे वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये तापमान 43 अंशांपर्यंत जाऊन पोहोचले असून, दुपारी किंवा सायंकाळी सामान्यतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
3/7
अकोल्यात तापमान 44 अंशांपर्यंत पोहोचले असून, येथेही दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. वर्धा शहरात कमाल तापमान 42 अंश इतके नोंदवले गेले असून दुपारी अंशतः ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज आहे.
advertisement
4/7
गोंदियात तापमान 37 अंश इतके असून, येथे वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बुलढाण्यात 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, येथे अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
चंद्रपूरमध्ये कमाल तापमान 43 अंश असून, विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. एकूणच विदर्भातील बहुतांश भागात उष्णतेचा तडाखा जाणवत असून, काही जिल्ह्यांत अचानक हवामान बदलून वादळी पावसाचा सामना करावा लागू शकतो. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.
advertisement
6/7
उन्हापासून संरक्षण करावे व हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वादळी वाऱ्यासह पावसामुळं शेतीचे देखील नुकसान होण्याची भीती आहे.
advertisement
7/7
त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून शेतीमधील नुकसान होण्यास टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Wether Alrt : विदर्भासाठी 24 तास महत्त्वाचे, उष्णतेच्या लाटेत 6 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट