आधी बायकांनी अडवलं, नंतर तरुणाने कुऱ्हाडीने भाजप नेत्याला तोडलं, सांगलीतील घटनेचे भयानक PHOTOS
- Published by:sachin Salve
Last Updated:
राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. एकीकडे आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. तर दुसरीकडे सांगलीतील मिरजेमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. भर दिवसा भाजपच्या पदाधिकाऱ्याची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली आहे. (आसिफ मुरसल, प्रतिनिधी)
advertisement
1/8

राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. एकीकडे आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. तर दुसरीकडे सांगलीतील मिरजेमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. भर दिवसा भाजपच्या पदाधिकाऱ्याची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
advertisement
2/8
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधाकर खाडे असं भाजपच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. सुधाकर खाडे हे आधी मनसेमध्ये होते. अलीकडेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शेतीच्या वादातून त्यांची हत्या झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
advertisement
3/8
सुधाकर खाडे हे आज मिरज शहरातल्या पंढरपूर रोडवरील राम मंदिर परिसरामध्ये एका शेताचा ताबा घेण्यासाठी गेले होते. या शेतीवर आपला ताबा असल्याचा त्यांचा दावा होता.
advertisement
4/8
जेव्हा खाडे हे ताबा घेण्यासाठी पोहोचले त्यावेळी चंदनवाले कुटुंबातील महिलांनी सुधाकर खाडे यांना अडवण्याचा प्रयत्न केला. महिलांना साखळी करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
advertisement
5/8
पण खाडेंनी महिलांना न जुमानता शेतामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान चंदनवाले कुटुंबातील एका तरुण पुढे आला. हा सुरुवातील खाडेंचा व्हिडीओ रेकॉर्ड करत होता.
advertisement
6/8
पुढे काही अंतरावर गेल्यानंतर एका व्यक्तीच्या हातातून त्याने कुऱ्हाड घेतली. तोपर्यंत खाडे हे शेतातील घराजवळ पोहोचले होते.
advertisement
7/8
खाडे हे लोकांनी बोलत होते त्यावेळी पाठीमागून धावत येऊन या तरुणाने त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. वार वर्मी बसल्यामुळे खाडे जागेवर कोसळले. हा सगळा प्रकार मोबाईलच्या व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला.
advertisement
8/8
जखमी अवस्थेत खाडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सुधाकर खाडे हे मनसेच्या स्थापनेपासून जिल्हाध्यक्ष होते. काही दिवसांपूर्वी खाडे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करुन भाजपामध्ये प्रवेश केला होता. शेत जमिनीच्या वादातून खाडे यांना जीवे मारण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
आधी बायकांनी अडवलं, नंतर तरुणाने कुऱ्हाडीने भाजप नेत्याला तोडलं, सांगलीतील घटनेचे भयानक PHOTOS