Supermoon 2025: आज रात्री चंद्र येणार पृथ्वीच्या जवळ, 'सुपर मून' पाहण्याची खास संधी PHOTOS
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच आज 'सूपर मून'चं दर्शन होणार असल्याची माहिती पंचागकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी दिली आहे. आजच्या दिवशी आकाशात चंद्र पृथ्वीच्या जवळ असेल, तर चंद्रबिंब मोठे आणि अधिक तेजस्वी दिसणार आहे.
advertisement
1/6

त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच आज (बुधवार- 05 नोव्हेंबर) 'सूपर मून'चं दर्शन होणार असल्याची माहिती पंचागकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी दिली आहे. आजच्या दिवशी आकाशात चंद्र पृथ्वीच्या जवळ असेल, तर चंद्रबिंब मोठे आणि अधिक तेजस्वी दिसणार आहे.
advertisement
2/6
बुधवारी 5 नोव्हेंबर रोजी 'सूपरमून' सायं. 05: 44 वाजता पूर्वेला उगवेल आणि रात्रभर आपणास सुंदर दर्शन देईल. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान आणि कमी तेजस्वी दिसणाऱ्या चंद्राला मायक्रो मून म्हणतात. पण आज आकाशात 'मायक्रो मून' दिसणार नसून 'सूपर मून' दिसणार आहे.
advertisement
3/6
'सूपर मून'मध्ये आणि 'मायक्रो मून'मध्ये काही अंशी फरक असतो. 'सूपर मून' हा 'मायक्रो मून'पेक्षा 13 टक्के मोठा आणि 30 टक्के जास्त तेजस्वी दिसतो. तसा तो बुधवारी 5 नोव्हेंबर रोजी रात्री दिसणार आहे. सायंकाळी 5 वाजून 44 मिनिटांपासून नागरिकांना पाहायला मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 'सूपर मून'ची चर्चा होतेय.
advertisement
4/6
'सूपर मून' विषयी अधिक माहिती देताना दा.कृ. सोमण म्हणाले की , पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ असेल तर चंद्रबिंब जास्त मोठा आणि जास्त तेजस्वी मनोहारी दिसतो. तसाच चंद्र नागरिकांना बुधवारी 5 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री दिसणार आहे. हा चंद्र पाहण्यासाठी नागरिक आतुर आहेत.
advertisement
5/6
चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3 लक्ष 84 हजार किलोमीटर अंतरावर असतो. या दिवशी तो पृथ्वीपासून 3 लक्ष 56 हजार 834 किलोमीटर पर्यंत येणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान आणि कमी तेजस्वी दिसते. याला ‘मायक्रो मून’ म्हणतात.
advertisement
6/6
आजच्या 'सूपर मून'प्रमाणे पुढील सुपरमून पुढच्याच महिन्यात गुरूवार, ४ डिसेंबर रोजी दत्तजयंतीच्या रात्री दिसणार असल्याचं दा.कृ.सोमण यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Supermoon 2025: आज रात्री चंद्र येणार पृथ्वीच्या जवळ, 'सुपर मून' पाहण्याची खास संधी PHOTOS