स्टार क्रिकेटरची FLOP बायको, 3 फिल्म्समध्येच बुडालं करिअर; तरीही कोटींची मालकिण, कुठून करते कमाई?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
बॉलिवूडमध्ये नेपो किड्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही कलाकारांना पडद्यावर अपेक्षित यश मिळत नाही, पण तरीही त्यांची लाईफस्टाईल आणि संपत्ती मात्र नेहमीच चर्चेत राहते.
advertisement
1/8

मुंबई: बॉलिवूडमध्ये नेपो किड्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही कलाकारांना पडद्यावर अपेक्षित यश मिळत नाही, पण तरीही त्यांची लाईफस्टाईल आणि संपत्ती मात्र नेहमीच चर्चेत राहते.
advertisement
2/8
अशीच एक अभिनेत्री म्हणजे सुनील शेट्टीची मुलगी आणि स्टार क्रिकेटर केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टी. अथियाचा फिल्मी प्रवास अवघ्या तीन फिल्म्समध्ये संपला, आणि त्या तिन्ही फिल्म्स फ्लॉप ठरल्या. मग गेली अनेक वर्षे सिनेसृष्टीपासून दूर असूनही ती कोट्यवधींची मालकीण कशी बनली?
advertisement
3/8
अथिया शेट्टीने २०१५ मध्ये 'हिरो' या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत आदित्य पंचोलीचा मुलगा सूरज पंचोली होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आणि अथियाच्या करिअरची सुरुवात निराशाजनक झाली. यानंतर तिने 'मुबारकां' आणि 'मोतीचूर चकनाचूर' हे सिनेमे केले, पण तेही फ्लॉप झाले.
advertisement
4/8
एका मुलाखतीत सुनील शेट्टींनी सांगितले होते की, 'मोतीचूर चकनाचूर' नंतर अथियाला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या, पण तिने स्पष्टपणे सांगितले, "बाबा, मला हे सर्व आता करायचे नाही." अभिनयात मन न रमल्यामुळे तिने सिनेसृष्टीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला.
advertisement
5/8
अभिनय क्षेत्रात अपयशी ठरलेली अथिया, फॅशन आणि लक्झरी जगात मात्र क्वीन ठरली आहे. तिचे इंस्टाग्राम अकाउंट फॅशन आणि ब्यूटी अॅस्थेटिक्सने भरलेले आहे. अथियाची कमाई प्रामुख्याने अभिनयातून नाही, तर खालील तीन ठिकाणांहून होते.
advertisement
6/8
अथिया अनेक देशी-विदेशी ब्रँड्सचा चेहरा आहे. मेबलिन, नायका, लेबल रितू कुमार यांसारख्या ब्यूटी आणि फॅशन ब्रँड्ससोबत तिचे डिल्स आहेत. ती एका जाहिरातीसाठी ३० लाख ते ५० लाख रुपये इतके शुल्क घेते.
advertisement
7/8
अथियाची सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. स्पॉन्सर्ड पोस्ट्सद्वारे ती लाखो रुपये कमवते. इतकंच नाही, तर अथिया शेट्टीने मुंबईतील आलिशान अपार्टमेंट्ससह अनेक शहरांतील रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे. रिपोर्ट्सनुसार, अथिया शेट्टीची एकूण संपत्ती सध्या ३५ ते ४५ कोटी रुपयांच्या घरात आहे.
advertisement
8/8
अथिया शेट्टीने २०२३ मध्ये क्रिकेटपटू केएल राहुलसोबत लग्न केले. याच वर्षी २४ मार्चला अथियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. अथिया सध्या वैयक्तिक आयुष्यात खूप आनंदी आहे आणि लग्नानंतर तिची लाईफस्टाईल अधिक चर्चेत आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
स्टार क्रिकेटरची FLOP बायको, 3 फिल्म्समध्येच बुडालं करिअर; तरीही कोटींची मालकिण, कुठून करते कमाई?