TRENDING:

Buldhana accident : प्रवाशांनी भरलेली बस 100 फूट दरीत कोसळली, बुलढाण्यात मोठी दुर्घटना, घटनास्थळाचे पहिले photos

Last Updated:
बुलढाण्यामधून मोठी बातमी समोर आली आहे, 100 फूट दरीत कोसळून बसचा भीषण अपघात झाला आहे.
advertisement
1/7
प्रवाशांनी भरलेली बस 100 फूट दरीत कोसळली, बुलढाण्यात मोठी दुर्घटना, photos
बुलढाण्यामधून मोठी बातमी समोर आली आहे, दरीत कोसळून खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे.
advertisement
2/7
ही बस इंदोरहून अकोल्याकडे निघाली होती. जळगाव जामोद ते बुऱ्हाणपूर मार्गावर असलेल्या करोली घाटात बस शंभर फूट दरीत कोसळली.
advertisement
3/7
या अपघातामध्ये 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी तातडीनं दर्यापूर आणि बुऱ्हाणपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
4/7
पहाटे साडेपाच वाजेच्या सुमासार हा अपघात घडला आहे, सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
advertisement
5/7
जळगाव जामोद - बुऱ्हाणपूर मार्गावरील दुर्गम अशा करोली घाटात हा अपघात झाल्याने मदत कार्य उशिरा सुरू झालं
advertisement
6/7
अपघाताची माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलीस रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. बस दरीत कोसळल्यानं बचाव कार्यात अडथळे येत होते. मात्र पोलिसांनी सर्व जखमींची सुखरूप सुटका करत त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.
advertisement
7/7
हा अपघात नेमका कसा झाला याबाबत माहिती मिळू शकलेली नाहीये, मात्र चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana accident : प्रवाशांनी भरलेली बस 100 फूट दरीत कोसळली, बुलढाण्यात मोठी दुर्घटना, घटनास्थळाचे पहिले photos
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल