Chandrapur News : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख पुन्हा एकदा अजिंक्य! चंद्रपुरात 48 वर्षानंतर कुस्तीचा थरार
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Chandrapur News : 48 वर्षानंतर चंद्रपुरात राष्ट्रीय पातळीच्या कुस्तीचा थरार बघायला मिळाला. (हैदर शेख, प्रतिनिधी)
advertisement
1/5

चंद्रपुरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने सध्या माता महाकाली क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने 48 वर्षानंतर चंद्रपुरात राष्ट्रीय पातळीच्या कुस्तीचा थरार बघायला मिळाला.
advertisement
2/5
यात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख पुन्हा एकदा अजिंक्य ठरला. त्याने राष्ट्रीय कुस्तीपटू दीपक काकरा याला केवळ 3 मिनिटात गारद केले.
advertisement
3/5
कुस्तीपटूंच्या सामन्याचे आयोजन महाकाली मंदिराच्या पटांगणात करण्यात आले. महिलांमध्ये अर्जुन पुरस्कारप्राप्त दिव्या काकरण विरुद्ध पंजाब व हरीयाणा केसरी जसप्रीत कौर यांच्यातील मुकाबला दिव्या काकरण हिने ताकदीने जिंकला.
advertisement
4/5
या सामन्यांआधी या सर्व कुस्तीपटूंची शहरातून रॅली काढण्यात आली. केवळ प्रदर्शनी कुस्ती नव्हे तर इंटरनेट- मोबाईलच्या गुंत्यात अडकलेल्या तरुणाईला खेळाप्रति आकर्षण निर्माण व्हावे यासाठी हे आयोजन असल्याचे आ. जोरगेवार म्हणाले.
advertisement
5/5
अधिकाधिक संख्येने मुला-मुलींनी कुस्ती अंगीकारावी असे मत अजिंक्य कुस्तीपटू सिकंदर शेख याने व्यक्त केले. कुस्तीप्रेमींच्या अलोट उत्साहात हे सामने पार पडले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/चंद्रपूर/
Chandrapur News : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख पुन्हा एकदा अजिंक्य! चंद्रपुरात 48 वर्षानंतर कुस्तीचा थरार