TRENDING:

मराठवाड्यात हुडहुडी! परभणी आणि बीडमध्ये थंडीचा जोर कायम, तुमच्या जिह्यात काय स्थिती?

Last Updated:
Marathwada Weather Update: राज्यातील अनेक भागात सध्या थंडीची लाट निर्माण झाली असून पारा चांगलाच घसरला आहे. आजच्या हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/5
मराठवाड्यात हुडहुडी! परभणी आणि बीडमध्ये थंडीचा जोर कायम
राज्यातील अनेक भागात सध्या थंडीची लाट निर्माण झाली असून पारा चांगलाच घसरला आहे. मराठवाड्यातमध्ये थंडीचा चांगलाच कडाका वाढला असून काही ठिकाणी तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे.
advertisement
2/5
परभणी आणि बीडमध्ये किमान तापमान आज 12 अंश सेल्सिअस एवढे असेल. या ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता सांगितलेली आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात थंडी ही अधिक आहे.
advertisement
3/5
जालना, नांदेड आणि हिंगोलीमध्ये किमान तापमान 13 अंश सेल्सिअस असेल. धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यामध्ये किमान तापमान 12 अंश सेल्सिअस असेल. या ठिकाणी तापमानात कुठलाही बदल झाला नाही.
advertisement
4/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस असेल. आणि किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहील. शहरामध्ये सकाळी मोठ्या प्रमाणात धुके असेल, असं देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आलेले आहे.
advertisement
5/5
दरम्यान, सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी पिकांची आणि फळाबागांची काजळी घ्यावी. थंडी वाढल्यामुळे आता शेतातील पिकावरती सकाळच्या वेळी दवबिंदू पडायला सुरुवात झालेली आहे. तर वाढत्या थंडीमुळे आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठवाड्यात हुडहुडी! परभणी आणि बीडमध्ये थंडीचा जोर कायम, तुमच्या जिह्यात काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल