मोठी बातमी! 12 उड्डाणपूल अन् 2 भुयारी मार्ग होणार, छ. संभाजीनगरचं रुपडं पालटणार
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. लवकरच शहरात 12 उड्डाणपूल आणि 2 भुयारी मार्गांची उभारणी केली जाईल.
advertisement
1/5

छत्रपती संभाजीनगरच्या वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार आहे. शहरातील कोंडी कमी करण्यासाठी आणि रस्ते अधिक सुकर करण्यासाठी 12 उड्डाणपूल व दोन भुयारी मार्गांचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळणार आहे.
advertisement
2/5
रुंदीकरणासाठी शहरातील सात मुख्य रस्त्यांवरील सुमारे 5,500 मालमत्तांवर कारवाई करण्यात आली. आता या रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता 12 उड्डाणपूल आणि दोन भुयारी मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव आहे. महावीर चौक ते पडेगाव यादरम्यान दुमजली उड्डाणपुलाची शिफारस करण्यात आली आहे.
advertisement
3/5
रस्ते विकासाच्या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून तो शासनाला सादर केला जाणार आहे. रस्ता रुंदीकरण करण्यासाठी महापालिकेने प्रमुख 5 रस्त्यांवर पाडापाडी केली. त्यात पडेगाव - मिटमिटा रस्ता, पैठण रस्ता, महानुभाव आश्रम ते झाल्टा फाटा हा बीड बायपास रस्ता, जालना रोड, जळगाव रोड या रस्त्यांचा समावेश आहे.
advertisement
4/5
पालिकेने पेडेको या एजन्सीची नियुक्ती असून या एजन्सीने दोन महिन्यांत अभ्यास करून प्राथमिक अहवाल तयार केला. रस्त्यांवरील वाहतुकीची घनता, वाहतूक कोंडी यांचा अभ्यास केला. त्या आधारे आराखड्याचे सादरीकरण 'पेडेको'चे प्रतिनिधी विजय पवार यांनी केले.
advertisement
5/5
दरम्यान, ‘पेडको’ ही कंपनी आंतराष्ट्रीय दर्जाची असून मुंबईत वरळी येथे उभा करण्यात आलेल्या अटल सेतू प्रकल्पातही या कंपनीचा सहभाग आहे. मागील दोन महिन्यांपासून शहरात ही कंपनी सर्वेक्षण करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मोठी बातमी! 12 उड्डाणपूल अन् 2 भुयारी मार्ग होणार, छ. संभाजीनगरचं रुपडं पालटणार