छ.संभाजीनगरमध्ये 'बुलडोझर पॅटर्न', जिथे वाहिला रक्ताचा पाट, त्या पैठण गेटमध्ये दुकानं 'साफ'!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिका सध्या ॲक्शन मोडवरती आलेली आहे. शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण हटवा कारवाई सुरू केली आहे.
advertisement
1/7

छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिका सध्या ॲक्शन मोडवरती आलेली आहे. शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण हटवा कारवाई सुरू केली आहे. महानगरपालिकेने बुधवारी शहरातील मुख्य भाग म्हणजे पैठण गेट या भागांमध्ये देखील कारवाई केलेली आहे. या ठिकाणी जे अतिक्रमण होते ते सर्व महानगरपालिकेने जमीनदोस्त केलेले आहेत.
advertisement
2/7
मंगळवारपासून बहुतांश व्यापाऱ्यांनी आपले सामान काढून घेण्यास सुरुवात केली होती. महानगरपालिकेच्या पथकाने कारवाईला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एका युवकाचा खून झाला होता, त्या दोन दुकानांपासून महानगरपालिकेने अतिक्रमण हटवायला सुरुवात केली, सर्वात पहिले दोन दुकाने भुईसपाट केली.
advertisement
3/7
महानगरपालिकेने पैठण गेट सब्जी मंडी परिसरातील मुख्य रस्ते मोकळे केले आहेत. 118 पेक्षा अधिक दुकाने, निवासस्थाने अतिक्रमण भाग जेसीपी पोकलेनच्या साहाय्याने पाडण्यात आला आहे.
advertisement
4/7
सब्जी मंडी येथील नऊ मीटर म्हणजे जवळपास तीस फूट रुंद झालेला रस्ता पाहून शहरवासीयांना आश्चर्य वाटले आहे. मनपा पार्किंगच्या बाजूला अनेक मोबाईलची दुकाने, त्यासोबत सर्वात जुने ज्यूस सेंटर होते, त्यावर देखील बुलडोझर फिरवण्यात आला.
advertisement
5/7
पैठण गेटची अलीकडे मोबाईल मार्केट अशी ओळख निर्माण झाली होती. या ठिकाणी अनेक अशी मोबाईलची दुकाने होती. त्या सर्व दुकानांवरती बुलडोझर चाललेला आहे. पैठण गेट पार्किंगच्या उजव्या बाजूला तीन मजली इमारती ती देखील पोकलेनच्या साहाय्याने पाडण्यात आलेल्या.
advertisement
6/7
पैठण गेटच्या अगदी समोर सब्जी मंडीमध्ये जाण्यास नऊ मीटरचा रस्ता विकास आराखड्यात आहे, या रस्त्यावर एवढे अतिक्रमण होते की तिथून फक्त दुचाकी वाहने ये-जा करू शकत होती. यावर देखील कारवाई करण्यात आलेली आहे.
advertisement
7/7
पैठणगेट परिसरातील 110 व्यापाऱ्यांना महापालिकेने नोटीस बजावून मालकी हक्काची कागदपत्रे, बांधकाम परवानगीची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी चार ते पाच मालमत्ताधारकांनीच कागदपत्रे सादर केली. अन्य व्यापाऱ्यांकडे कागदपत्रे नसल्याने कारवाई करण्यात आल्याचे संतोष वाहुळे यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
छ.संभाजीनगरमध्ये 'बुलडोझर पॅटर्न', जिथे वाहिला रक्ताचा पाट, त्या पैठण गेटमध्ये दुकानं 'साफ'!