TRENDING:

Weather Alert: मराठवाड्यात मुसळधार पाऊस, पण काही जिल्ह्यांना 24 तासांसाठी पुन्हा अलर्ट

Last Updated:
बुधवारी सायंकाळपासून जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होत आहे. यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
advertisement
1/7
मराठवाड्यात मुसळधार पाऊस, पण काही जिल्ह्यांना 24 तासांसाठी पुन्हा अलर्ट
मागील तब्बल पंधरा दिवसांपासून मराठवाड्यासह संपूर्ण जालना जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याचे चित्र पाहायला मिळालं. परंतु बुधवारी सायंकाळपासून जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होत आहे. यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
advertisement
2/7
सोयाबीनची पेरणी केलेल्या तसेच कपाशीच्या लागवड केलेल्या असंख्य शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे होते. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके सुकू लागली होती. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी तुषार आणि ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पिकांना सिंचित करण्याचं काम देखील सुरू केलं होतं.
advertisement
3/7
परंतु बुधवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने बळीराजाला तर दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना देखील वाढत्या उष्णतेपासून काहीसा आराम मिळाला आहे.
advertisement
4/7
जालना जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर संपूर्ण जिल्हाभर हलका ते मध्यम पाऊस होणार आहे.
advertisement
5/7
शुक्रवारसाठी देखील जिल्ह्यासाठी यलो अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे. 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
6/7
दरम्यान जालना जिल्ह्याबरोबरच छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
7/7
मराठवाड्यात होत असलेल्या सर्वदूर पावसाने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला दिलासा मिळाला असून खरीप पिकांना यामुळे जीवनदान मिळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: मराठवाड्यात मुसळधार पाऊस, पण काही जिल्ह्यांना 24 तासांसाठी पुन्हा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल