TRENDING:

Marathwada Rain: हवामान विभागाकडून Good News आली, मराठवाड्यात या दिवसापासून सुरू होणार पाऊस

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अशातच हवामान विभागाकडून महत्त्वाचं अपडेट आलं असून पुढील 2 दिवस पावसाची वाट पाहावी लागणार आहे.
advertisement
1/5
हवामान विभागाकडून Good News आली, मराठवाड्यात या दिवसापासून सुरू होणार पाऊस
राज्यातील काही भागात मान्सूनचा जोर कायम असून काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा आहे. मराठवाड्यात गेल्या काही काळात पावसाने उघडीप दिल्याने खरीप पेरण्या केलेले शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहात आहेत. पुढील 24 तासांतील हवामान स्थितीचा अंदाज घेऊ.
advertisement
2/5
मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, या 4 जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर धाराशिव आणि लातूरमध्ये देखील तुरळक हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
3/5
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा कोणताही अलर्ट दिलेला नाही, मात्र ढगाळ हवामानासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या 24 तासांत मराठवाड्यातील 2 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला होता. परंतु आता हवामानात मोठे बदल जाणवत असून पुन्हा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे.
advertisement
4/5
छत्रपती संभाजीनगर, जालन्यात आजपासून 2 दिवस पावसाची उघडीप राहील. त्यानंतर पुन्हा पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. तर हिंगोली आणि नांदेडमध्ये शुक्रवारी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. उर्वरित मराठवाड्यात पावसाची तीव्रता कमी राहणार असून पुढील काही काळ हीच स्थिती राहील.
advertisement
5/5
खरीपाची पेरणी केलेले शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. पावसाने ओढ दिल्याने पिके संकटात असून शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. पुढील 2 दिवसानंतर म्हणजेच 5 आणि 6 जुलैपासून पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला असून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Rain: हवामान विभागाकडून Good News आली, मराठवाड्यात या दिवसापासून सुरू होणार पाऊस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल