Weather Alert: ताशी 40 किमीने वारे वाहणार, विजा कडाडणार, छ. संभाजीनगर, बीडसह 8 जिल्ह्यांना अलर्ट
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला असून आज 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/5

गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यभर पावसाने जोर धरला आहे. विशेषतः मराठवाड्यातील बऱ्याच भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून वाऱ्याचा वेगही वाढलेला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार या भागांमध्ये 13 सप्टेंबरपासूनच पावसाचे प्रमाण वाढले असून येत्या 24 तासात जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
2/5
हवामान विभागाने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत हिंगोली, बीड, जालना, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव आणि छत्रपती संभाजी नगर यांचा समावेश आहे. या काळात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
advertisement
3/5
मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर राहणार आहे. विशेषतः परभणी आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत थोडे अधिक राहण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेगही सुमारे 30 ते 40 किमी प्रतितास इतका असू शकतो, ज्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी बाळगावी लागणार आहे.
advertisement
4/5
मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. गेले काही दिवस दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. जायकवाडी धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
advertisement
5/5
छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यांत पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम राहील. त्यानंतर काही जिल्ह्यांत पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे. परंतु, हवामान ढगाळच राहणार असून शेतकऱ्यांना आपल्या शेतीपिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागेल. तसेच नागरिकांना देखील आरोग्य जपावं लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: ताशी 40 किमीने वारे वाहणार, विजा कडाडणार, छ. संभाजीनगर, बीडसह 8 जिल्ह्यांना अलर्ट