TRENDING:

Weather Alert: मराठवाड्यात हवापालट, आज पाऊस की उघडीप, IMD कडून महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
Marathwada Rain: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून बहुतांश भागातून पावसाने उघडीप घेतलीये. मराठवाड्यातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
Weather Alert: मराठवाड्यात हवापालट, आज पाऊस की उघडीप, IMD कडून महत्त्वाचं अपडेट
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या संततधार पावसाने अखेर विश्रांती घेतली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या बहुतांश भागात सध्या आकाश काही प्रमाणात ढगाळ राहील, परंतु, मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही. मराठवाड्यात देखील हीच स्थिती असून पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
8 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला होता. त्यानुसार तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मात्र, आज मराठवाड्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत.
advertisement
3/5
आज, गुरुवारी मराठवाड्यात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरसह आज कोणत्याही जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
advertisement
4/5
मराठाड्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 3 दिवस ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून त्यानंतर मात्र हवामान कोरडे होईल. तापमानात वाढ होण्याची शक्यता असून मराठवाड्यात ‘ऑक्टोबर हिट’चे चटके जाणवतील.
advertisement
5/5
दरम्यान, कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना या स्थिर हवामानाचा फायदा घेण्याचा सल्ला दिला आहे. रब्बी हंगामासाठी जमिनीची मशागत, बियाणं निवड आणि खत व्यवस्थापन याकडे लक्ष देण्याचा हा योग्य काळ असल्याचं सांगण्यात आलं आहे. पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचं चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: मराठवाड्यात हवापालट, आज पाऊस की उघडीप, IMD कडून महत्त्वाचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल