TRENDING:

Cold Wave: मराठवाड्यावर नवं संकट! 3 दिवस धोक्याचे, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
Weather update: अवकाळी संकटाने झोडपून काढल्यानंतर मराठवाड्यावर नव्या संकटाची शक्यता आहे. 3 जिल्ह्यांना ‘कोल्ड वेव्ह’चा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/5
Cold Wave: मराठवाड्यावर नवं संकट! 3 दिवस धोक्याचे, हवामान विभागाचा अलर्ट
राज्यातील काही भागात पुढील तीन दिवस शीतलहरीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील तापमानात मोठी घट होणार आहे. 17 नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगरसह जालना आणि बीड जिल्ह्यात 'कोल्ड वेव्हचा' इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
आज 15 नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये निरभ्र आकाश बघायला मिळणार आहे, तर काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरचे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. रविवारी, 16 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
advertisement
3/5
जालना, परभणी, बीड हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये साधारणतः वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच निरभ्र आकाश असणार असून तापमानात पुढील तीन दिवसांत जास्त घट होणार आहे. तसेच येणाऱ्या 48 तासांमध्ये थंडीची लाट येऊ शकते.
advertisement
4/5
लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांतही हवामान कोरडेच राहणार आहे. तसेच येथील कमाल तापमान अंदाजे 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहू शकते. सतत कमी होत असलेल्या तापमानामुळे या भागांतही थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
5/5
पुढील तीन दिवसांत राज्यासह मराठवाड्यात किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी तापमान 7 ते 8 अंश सेल्सिअस इतके खाली येईल. त्यामुळे नागरिकांनी स्वतःसह ज्येष्ठांची व लहान मुलांची आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Cold Wave: मराठवाड्यावर नवं संकट! 3 दिवस धोक्याचे, हवामान विभागाचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल