TRENDING:

Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाचं धुमशान सुरूच, 8 जिल्ह्यांना अलर्ट, 14 ऑगस्टचा हवामान अंदाज

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. आज पुन्हा छत्रपती संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5
मराठवाड्यात पावसाचं धुमशान सुरूच, 8 जिल्ह्यांना अलर्ट, 14 ऑगस्टचा हवामान अंदाज
मराठवाड्यामध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. 14 ऑगस्ट रोजी म्हणजेच आज देखील पावसाचा जोर कायम राहील. मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी घ्यावी लागेल.
advertisement
2/5
मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजी नगर मध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस होईल.
advertisement
3/5
बुधवारी परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. याठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. या तीन जिल्ह्यांत आज पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने तिन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून पुढील 4 दिवस पावसाचा जोर कायम राहील.
advertisement
4/5
जालना, बीड, लातूर आणि धाराशिवमध्ये आज ताशी 30 ते 40 किमीने वारे वाहणार असून गडगडाटी पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहणार आहे. बुधवारी देखील या जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला.
advertisement
5/5
दरम्यान, पुढचे दोन ते तीन दिवस मराठवाड्यावर मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये पाणी साचल्यास ते पाणी शेता बाहेर काढण्याचे नियोजन करावं. नागरिकांनी घराबाहेर पडताना रेनकोट किंवा छत्री सोबत बाळगावी आणि हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे, असा आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाचं धुमशान सुरूच, 8 जिल्ह्यांना अलर्ट, 14 ऑगस्टचा हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल