TRENDING:

Marathwada Rain: वादळी वारे अन् विजांचा कडकडाट, मराठवाड्यात पावसाचा जोर, 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाची तीव्रता वाढली असून पुढील काही काळ वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
1/5
वादळी वारे अन् विजांचा कडकडाट, मराठवाड्यात पावसाचा जोर, 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यात काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा मुसळधार सुरुवात केली आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ भागात हवामानात बदल होत असून ढगाळ वातावरणासह पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात आज 5 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पवसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
2/5
आज 5 ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढणार आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवला हवामान विभागाने 'यलो अलर्ट' जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा अन् विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज हलक्या पावसाची शक्यता आहे. तर जालन्यातही पावसाची तीव्रता कमी राहील. या दोन्ही जिल्ह्यांत पुढील काही काळ पावसाचा जोर कमीच राहणार असून कोणताही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला नाही.
advertisement
4/5
मराठवाड्यातील उर्वरित सहा जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. आज बीडला कोणताही सतर्कतेचा इशारा नसला तरी बुधवारपासून बीडमध्ये जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात सर्व जिल्ह्यांत ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील.
advertisement
5/5
दरम्यान, पुढील आठवडाभर मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे शेतकरी आणि नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Rain: वादळी वारे अन् विजांचा कडकडाट, मराठवाड्यात पावसाचा जोर, 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल