TRENDING:

Weather Alert: सप्टेंबर संपला, तरी संकट कायम! मराठवाड्यात धो धो कोसळणार, 6 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: महाराष्ट्रातून नियमित पावसाचा सप्टेंबर अखेर संपला असला तरी हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मराठवाड्याला पुढील 2 दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल आहे.
advertisement
1/5
सप्टेंबरल संपला, तरी संकट कायम! मराठवाड्यात धो धो कोसळणार, 6 जिल्ह्यांना अलर्ट
महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. सप्टेंबरअखेर पावसाळा संपला असला तरी मराठवाड्यात वेगळेच चित्र आहे. विजयादशीच्या दुसऱ्या दिवशी मराठवाड्यात पुन्हा पावसाचं धुमशान सुरू होणार आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह पुढील 48 तास मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/5
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज 3 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यात पुन्हा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना हे दोन जिल्हे वगळता उर्वरित सहा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये हिंगोली, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे.
advertisement
3/5
मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तसेच विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील 48 तास हवामानाची हीच स्थिती राहणार असून काही ठिकाणी जोरदार तर कुठं हलका ते मध्यम पाऊस होईल.
advertisement
4/5
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात मात्र हवामानाची काहीशी वेगळी स्थिती जाणवेल. याठिकाणी ढगाळ हवामान राहणार असून विजांसह हलका ते मध्यम पाऊस होईल. मात्र, या दोन्ही जिल्ह्यांना पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा कोणातही अलर्ट नाही.
advertisement
5/5
दरम्यान, गेल्या काही काळात झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले. 3-4 दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा पावसाचं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. पुढील 48 तास पावसाचा अलर्ट राहणार असून त्यानंतर मात्र पुन्हा हवापालट होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: सप्टेंबर संपला, तरी संकट कायम! मराठवाड्यात धो धो कोसळणार, 6 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल