TRENDING:

Weather Alert: मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल, आज पाऊस की उघडीप, मंगळवारचा हवामान अंदाज

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात पुन्हा बदल जाणवत आहेत. छत्रपती संभाजीनगरसह आठ जिल्ह्यांतील आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/5
मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल, आज पाऊस की उघडीप, मंगळवारचा हवामान अंदाज
गेल्या काही दिवसांत राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. आता मात्र पावसाचा जोर ओसरला असून मराठवाड्यात देखील तीव्रता कमी झाली आहे. तरीही मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात श्रावण सरी बरसत आहेत. 29 जुलैचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज जिल्ह्यात तुरळक हलक्या पावसाची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून धरण 85 टक्के भरले आहे.
advertisement
3/5
जालना, हिंगोली आणि परभणी या ठिकाणी देखील 29 जुलै रोजी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तसेच या ठिकाणी देखील तापमान मोठी घट झालेले आहे. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती राहणार असून मुसळधार पावसाची कोणतीही शक्यता नाही.
advertisement
4/5
हिंगोली, नांदेड, धाराशिव आणि बीड या ठिकाणी देखील मंगळवारी हलक्या शक्यता आहे. या चार जिल्ह्यांतील काही भागात पावसाच्या तुरळक सरी बरसतील. परंतु, कुठलाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
advertisement
5/5
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. तर काही भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. आता मात्र पावसाचा जोर ओसरला असून पुढील काही काळ मोठ्या पावसाची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यानुसार नियोजन करावं लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल, आज पाऊस की उघडीप, मंगळवारचा हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल